मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदीं सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते 38 हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ तसेच अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.
लोकार्पण आणि उद्घाटनानंतर मोदींनी बीकेसीत उपस्थित हजारो नागरिकांना संबोधित केले. या भाषणात नेमकं मोदी काय म्हणाले हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.
बीकेसीती भाषणाची सुरूवात मोदींनी मराठीतून केली. त्यांच्या या खास सुरूवातीला उपस्थितांनी टाळा वाजवून दाद दिली.
मुंबई शहराला चांगलं बनवण्यात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज भारत मोठं स्वप्न पाहण्याचं आणि पूर्ण करण्याचं धाडस करतोय. भारताच्या मोठ्या संकल्पावर जगाचा विश्वास असल्याचे मोदी म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी दावोसमधला जो अनुभव व्यक्त केला. तसेच चित्र सगळीकडे दिसून येत आहे. भारताकडे आशेने पाहिलं जातंय असे ते म्हणाले.
मुंबईला भविष्यासाठी तयार करणं हे डबल इंजिन सरकारची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले.
आगामी बीएमसीच्या निवडणुकीत भाजपचं सरकार आल्यास विकास अधिक वेगान होईल.
मुंबईचा विकास हवा असल्यास स्थानिक पातळीवर सत्ता हवी असे म्हणत त्यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.
यावेळी त्यांनी मविआ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजकीय स्वार्थासाठी अनेक विकास कामांमध्ये अडथळे आणले गेल्याचे मोदी म्हणाले.
शिंदे आणि फडणवीसांची जोडी सत्तेत येताच राज्यात पुन्हा वेगाने काम होऊ लागली आहेत.
डबल इंजिन सरकार सामान्य नागरिकालाही आधुनिक सुविधा देण्याचे काम करत आहे.
कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीसांचे अभिनंदन करतो असे मोदी म्हणाले.