ग्राहकांना स्मार्ट इंजीनिअरिंग व सुधारित स्थानिकीकरणामधून दिले फायदे
ठळक वैशिष्ट्ये:
• नेक्सॉन ईव्ही श्रेणी आता १४.४९ लाख रूपयांच्या आकर्षक किंमतीपासून सुरूवात होण्यास रिपोझिशन
• नेक्सॉन ईव्ही मॅक्स श्रेणी पॅक केलेले नवीन वैशिष्ट्य नेक्सॉन ईव्ही मॅक्स एक्सएम व्हेरिएण्टसह १६.४९ लाख रूपयांच्या किंमतीपासून सुरूवात होण्यास रिपोझिशन
• नेक्सॉन ईव्ही मॅक्स प्रमाणित रेंज ४५३ किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे, विद्यमान ग्राहकांना १५ फेब्रुवारी २०२३ पासून सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून सुधारित रेंजचा लाभ मिळेल
मुंबई, जानेवारी १९, २०२३: भारतात नेक्सॉन ईव्ही लाँचच्या तीन वर्षांना साजरे करत टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीने आज किंमत व सुधारित रेंजमधील परिवर्तनासह भारतातील पहिल्या क्रमांकाची ईव्ही नेक्सॉन ईव्ही पोर्टफोलिओच्या रिपोझिशनिंगची घोषणा केली.
• ड्रायव्हिंग व वापर पद्धतींबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारावर नेक्सॉन ईव्ही मॅक्स व्हेरिएण्ट्सची रेंज २५ जानेवारी २०२३ पासून ४५३* किमीपर्यंत (एमआयडीसी) वाढवण्यात आली आहे. रेंजमधील ही सुधारणा विद्यमान नेक्सॉन ईव्ही मॅक्स मालकांना १५ फेब्रुवारी २०२३ पासून डीलरशिप्समध्ये सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून ऑफर करण्यात येईल.
• कंपनीने आज पोर्टफोलिओमधील सर्वोत्तम वैशिष्ट्ये असलेली नेक्सॉन ईव्ही मॅक्स एक्सएम ट्रिम लाँच केली. १६.४९ लाख रूपये आकर्षक किंमत असलेल्या या व्हेरिएण्टमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी®)सह आय-व्हीबीएसी, प्रोजेक्टर हेडलॅम्प्ससह एलईडी डीआरएल व एलईडी टेल लॅम्प्स, पुश बटन स्टार्ट, डिजिटल टीएफटी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, झेडकनेक्ट कनेक्टेड कार टेकसह स्मार्टवॉच कनेक्टीव्हीटी आणि रिअर डिस्क ब्रेक्स अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.
• टॉप एण्ड ट्रिम नेक्सॉन ईव्ही मॅक्स एक्सझेड+ लक्सची किंमत बदलून १८.४९ लाख रूपये करण्यात आली आहे. एक्सएमच्या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त या व्हेरिएण्टमध्ये लेदरेट सीट्ससह वेंटिलेशन, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, ऑटो डिमिंग आयआरव्हीएम, केबिन एअर प्युरिफायर, इलेक्ट्रिक सनरूफ, ८ स्पीकर्स असलेली हार्मनची १७.७८ सेमी फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टम, १६-इंच अलॉई व्हील्स, हिल डिसेंट कंट्रोल, शार्कफिन अॅन्टेना इत्यादी वैशिष्ट्ये आहेत.
• नेक्सॉन ईव्ही प्राइम एक्सएममध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स व एलईडी डीआरएल, पुश बटन स्टार्ट, डिजिटल टीएफटी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, झेडकनेक्ट कनेक्टेड कार टेकसह स्मार्टवॉच कनेक्टीव्हीटी, हार्मन इन्फोटेन्मेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. या व्हेरिएण्टची किंमत आता १४.४९ लाख रूपये करण्यात आली आहे.
संपूर्ण नेक्सॉन ईव्ही लाइन-अपसाठी बुकिंग्जना त्वरित सुरूवात झाली आहे. नवीन व्हेरिएण्ट नेक्सॉन ईव्ही मॅक्स एक्सएमच्या डिलिव्हरींना एप्रिल २०२३ पासून सुरूवात होईल.
नेक्सॉन ईव्ही पोर्टफोलिओमधील परिवर्तनाबाबत सांगताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.च्या विपणन, विक्री व सेवा धोरणाचे प्रमुख श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, ‘‘भारतातील पहिल्या क्रमांकाची ईव्ही नेक्सॉन ईव्हीने तिसरे यशस्वी वर्ष पूर्ण केले आहे. ४०,००० हून अधिक ग्राहकांना ही वेईकल आवडली आहे आणि त्यांनी या वेईकलवर विश्वास दाखवला आहे. या वेईकलने ६०० दशलक्ष किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास केला आहे. याप्रसंगी आम्ही सर्वांना शाश्वत परिवहन उपलब्ध करून देण्याप्रती कटिबद्ध आहोत आणि हे रिपोझिशनिंग त्याच दिशेने मोठे पाऊल आहे. आमचे स्मार्ट इंजीनिअरिंग आणि सरकारी प्रोत्साहनांनी आम्हाला हे यश प्राप्त करण्यास, तसेच आमच्या ग्राहकांना आमच्याकडून अपेक्षा असलेला दर्जा व सेवेचा तोच उच्च स्तर कायम राखण्यास मदत केली आहे. यासह आम्हाला विश्वास आहे की, अधिकाधिक ग्राहक ई-मोबिलिटीकडे वळतील.’’
किंमतीचा तक्ता:
मॉडेल व्हेरिएण्ट बॅटरी पॅक चार्जर पर्याय किंमत लाख रूपयांमध्ये
नेक्सॉन ईव्ही प्राइम एक्सएम ३०.२ केडब्ल्यूएच ३.३ केडब्ल्यू १४.४९
एक्सझेड+ १५.९९
एक्सझेड+ लक्स १६.९९
नेक्सॉन ईव्ही मॅक्स एक्सएम ४०.५ केडब्ल्यूएच ३.३ केडब्ल्यू १६.४९
एक्सझेड+ १७.४९
एक्सझेड+ लक्स १८.४९
एक्सएम ७.२ केडब्ल्यू १६.९९
एक्सझेड+ १७.९९
एक्सझेड+ लक्स १८.९९
अत्याधुनिक तंत्रज्ञान व नवोन्मष्कारी अभियांत्रिकी तंत्रांची अंमलबजावणी करत टाटा मोटर्स उत्पादन प्रक्रियेमध्ये एक प्रवाह आणण्यासोबत कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यास यशस्वी ठरली आहे. तसेच स्थानिकीकरणामुळे कंपनी शाश्वत व पर्यावरणास अनुकूल परिवहनाच्या अवलंबतेला चालना देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या गव्हर्नमेंट प्रॉडक्शन लिंक्ड इंसेन्टिव्ह्ज स्किम्सचा लाभ घेऊ शकली आहे. या उपक्रमांमुळे खर्चामध्ये बचत झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी वेईकल्सच्या किंमतीमध्ये घट करता आली आहे.
हाय व्होल्टेज अत्याधुनिक झिपट्रॉन तंत्रज्ञानाची शक्ती असलेल्या नेक्सॉन ईव्हीमध्ये आयपी६७ प्रमाणित वेदर-प्रूफ व धूळरोधक बॅटरी पॅक आहे, तसेच मोटर ८ वर्षे किंवा १६०,००० किमीच्या वॉरंटीसह येते, ज्यामधून परिपूर्ण मन:शांतीची खात्री मिळते. लाइन-अपमध्ये प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे, जसे डीसी फास्ट चार्जिंग, ४-लेव्हल मल्टी-मोड रिजेन, कस्टमायझेबल सिंगल पेडल ड्रायव्हिंग, प्रमाणित म्हणून झेडकनेक्ट कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, क्रूझ कंट्रोल, फुली ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, आय-टीपीएमएस, लेदरेट सीट्स आणि हार्मनची ब्रॅण्डेड इन्फोटेन्मेंट सिस्टम.
टाटा मोटर्स नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी वैशिष्ट्ये व रेंज सानुकूल करण्यासाठी ड्रायव्हिंग वर्तनावरील डेटा पॉइण्ट्सचे सतत विश्लेषण करते. जलद अवलंबतेला अधिक पाठिंबा देण्यासाठी कंपनी सर्वसमावेशक चार्जिंग पायाभूत सुविधा निर्माण करण्याप्रती आणि ईव्ही मालकांना पाठिंबा देण्याकरिता अपवादात्मक ग्राहक सेवा देण्याप्रती देखील कटिबद्ध आहे.