अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
‘वेदान्त फॉक्सकॉन’सह बरेच प्रकल्प परराज्यात गेल्याने महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. नवीन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. हा घटनाक्रम ताजा असताना अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘शिवतीर्थ’ येथे ही भेट झाली आहे.
गौतम अदाणी यांनी अशापद्धतीने राज ठाकरेंची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्क लावले जात आहे. महाराष्ट्रात नवीन प्रकल्प आणण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली असावी, असा तर्क लावण्यात येत आहे.
विशेष म्हणजे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील एका कार्यक्रमालाही गौतम अदाणी यांनी हजेरी लावली होती. यानंतर आज अदाणी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.