नवी मुंबई, सोमवार, १० जानेवारी २०२३: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज भारतातील सर्वात प्रगत, शून्य-उत्सर्जन, चारचाकी लहान व्यावसायिक वेईकल नवीन एस ईव्हीच्या डिलिव्हरींना सुरूवात करत आंतरशहरीय कार्गो परिवहनाकरिता शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्स प्रदान करण्यामध्ये लक्षणीय झेप घेतली. क्रांतिकारी एस ईव्हीचा पहिला ताफा अग्रगण्य ई-कॉमर्स, एफएमसीजी व कुरियर कंपन्यांना आणि त्यांचे लॉजिस्टिक्स सेवा प्रदाते: अॅमेझॉन, डेल्लिवरी, डीएचएल (एक्स्प्रेस व सप्लाय चेन), फेडेक्स, फ्लिपकार्ट, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंझ्युमर हेल्थ, मूईव्हींग, सेफएक्स्प्रेस आणि ट्रेण्ट लिमिटेड यांना डिलिव्हर करण्यात आला.
मे २०२२ मध्ये अनावरण करण्यात आलेली आणि युजर्ससोबतच्या संपन्न सहयोगाने सह-विकसित करण्यात आलेली नवीन एस ईव्हीने कठोर रिअल-वर्ल्ड मार्केट ट्रायल्सची यशस्वीरित्या पूर्तता केली आहे. परिश्रमपूर्वक तयार केलेल्या परिसंस्थेचे पाठबळ असलेली एस ईव्ही विनासायास कार्गो मोबिलिटीसाठी सर्वांगीण सोल्यूशन आणि ५ वर्षांचे सर्वसमावेशक मेन्टेनन्स पॅकेजसह येते. वेईकलच्या प्रबळ कामगिरीसह १०० टक्के अपटाइमला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एस ईव्हीच्या सपोर्टिंग इकोसिस्टममध्ये चार्जिंग पायाभूत सुविधांची अंमलबजावणी व तैनात, अधिकतम ताफा अपटाइमसाठी समर्पित इलेक्ट्रिक वेईकल सपोर्ट सेंटर्सची उभारणी, नेक्स्ट-जनरेशन सानुकूल फ्लीट मॅनेजमेंट सोल्यूशन टाटा फ्लीट एजचे तैनात, संबंधित टाटा ग्रुप कंपन्यांची प्रमाणित सक्षम इको-सिस्टम टाटा युनिईव्हीर्सचा पाठिंबा आणि निधीसाह्यसाठी देशातील आघाडीच्या फायनान्शियर्ससोबत सहयोगांचा समावेश आहे.
एस ईव्हींच्या पहिल्या ताफ्याला झेंडा दाखवत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्हणाले, ‘‘भारतीय रस्त्यांवर एस ईव्हींचे सादरीकरण शून्य-उत्सर्जन कार्गो गतीशीलतेच्या दिशेने प्रवासामधील मोठे पाऊल आहे. आमच्या भागीदारांसह सहयोगाने निर्माण करण्यात आलेले सर्वांगीण सोल्यूशन विविध आंतरशहरीय वितरण गरजांची पूर्तता करते आणि सर्व भागधारकांना उच्च दर्जाचे मूल्य तत्त्व देते. आमच्यावर विश्वास ठेवण्यासोबत पाठिंबा देण्यासाठी आम्ही ग्राहकांचे आभार व्यक्त करतो. एस ईव्हीप्रती त्यांचा प्रेरणादायी प्रतिसाद आम्हाला शाश्वत गतीशीलतेप्रती आमच्या प्रयत्नाला चालना देण्यास आणि देशाच्या निव्वळ-शून्य उत्सर्जन महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्यास प्रेरित करतो.’’