
- Lava Blaze 5G

Lava Blaze 5G फोन देशात उपलब्ध सर्व ५जी बँड सपोर्ट करतो. हँडसेटमध्ये ४ जीबी रॅम व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येवू शकते. फोनचे स्टोरेजचा वापर करून ३ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड १२ ऑपरेटिंग सिस्टम सोबत येतो. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. हँडसेट मध्ये ऑक्टा कोर २.२ गीगाहर्ट्ज मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर सोबत येतो. या फोनला १० हजार २५० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर सोबत खरेदी करू शकता. या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे.
POCO M4 5G

POCO M4 5G या स्मार्टफोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. पोकोच्या या फोनमध्ये ६.५८ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी व २ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनला फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफर व बँक ऑफर सोबत डिस्काउंट मिळत आहे.
Redmi Note 10T 5G

Redmi Note 10T 5G फोनला फ्लिपकार्टवर १२ हजार ९९९ रुपयात लिस्ट करण्यात आले आहे. रेडमीच्या या फोनमध्ये ४ जीबी रॅम व ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा मायक्रो, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. हँडसेटमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे.
Maplin S10 Plus

Maplin S10 Plus स्मार्टफोनची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. या किंमतीत ४ जीबी रॅम व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोनमध्ये ५.९९ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हँडसेटमध्ये १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियरवर २१ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर उपलब्ध आहे.