दीर्घकाळानंतर मुंबईला भेट देणार्या कोणत्याही व्यक्तीला शहरात झपाट्याने झालेला बदल दिसून येईल. विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये झपाट्याने वाढ झाल्यामुळे उपनगरीय लँडस्केपमध्ये अभूतपूर्व परिवर्तन झाले आहे. हिरवळ असलेले परिसर, म्हशींचे शेड आणि सुलभ जीवनशैलीने युक्त खारफुटीने आच्छादलेल्या जमिनीत वसलेल्या जुन्या खेडूत परिसरामध्ये आता उंच इमारती, बहुपदरी महामार्ग, वेगवान धावणाऱ्या कार्स, फास्ट फूड जॉइंट्स आणि उत्साहपूर्ण लोक असे परिवर्तन घडून आले आहे. ज्यामुळे या परिसरातील लोकांना उत्तम जीवनशैलीचा जितका आनंद मिळेल ते कमीच आहे असे वाटू शकते.
मालाड हे पश्चिम उपनगरातील असेच एक स्थानिक गंतव्य आहे, जे आता विकासकांमध्ये लोकप्रिय बनले आहे. पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथून पश्चिम द्रुतगती महामार्ग जातो. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड मालाडला पवईशी जोडतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवळ आहे, जे कुटुंबांना निसर्गाच्या मूल्याचे कौतुक करण्याची दुर्मिळ संधी देते आणि परिसराचे काही पूर्वीचे रमणीय वातावरण राखून ठेवते. मेट्रो स्टेशन, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आगामी कोस्टल रोड हे सर्व जवळच आहेत, ज्यामुळे मालाड हे शहरातील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांशी उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी असलेले महत्त्वाचे केंद्र बनले आहे. कुलाबा आणि सीप्झला जोडणारी नवीन मेट्रो लाइन २ मालाडमधून जाईल.
निवासी प्रॉपर्टीजची वाढ होण्यासोबत व्यावसायिक रिअल इस्टेटमध्येही वाढ झाली आहे. सहजपणे उपलब्ध होऊ शकणाऱ्या अनेक सुविधांमुळे रहिवाशांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत नाही. निवासी, व्यावसायिक आणि आयटी केंद्रांची मागणी पूर्ण करण्यासाठी विकासक प्रकल्प हाती घेत आहेत. विविध आकारांची अपार्टमेंट्स आणि रो हाऊसेस आता सर्व उत्पन्न गटांना साजेशा सुविधांसह उपलब्ध आहेत. या सर्व बाबी मालाडला आधुनिक, कॉस्मोपॉलिटन आणि फॅशनेबल क्षेत्र म्हणून विकसित होण्यास साह्यभूत ठरत आहेत. त्यामुळे मालाड हे आता मुंबईच्या वेगाने वाढणाऱ्या उपनगरांपैकी एक आहे. दहिसर-मांडाळे मेट्रो लाइन २बी पूर्ण झाल्यावर निवासी प्रकल्पांची वाढती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
प्रॉपर्टी गुंतवणूकदार गुंतवणुकीचा किफायतशीर पर्याय म्हणून मालाडला पसंती देत आहेत. हे पश्चिम उपनगरातील सर्वात जास्त मागणी असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी व वाहतुकीमुळे उच्च उत्पन्न आणि कामगार वर्गाच्या कुटुंबांकडून येथील प्रॉपर्टीना जास्त मागणी होत आहे. असंख्य प्रकल्प पूर्ण झाले आहेत किंवा त्यांचे बांधकाम सुरू आहे, असे असले तरीही मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी जागा आहे आणि नजीकच्या भविष्यात आणखी प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा आहे.
मालाड पश्चिमेकडील मरीना एन्क्लेव्ह हा गुरुकृपा ग्रुपचा १० एकर जमिनीवर पसरलेला प्रकल्प व्यस्त शहरी जीवनाच्या गजबजलेल्या सीमेवर हिरवाईने नटलेला आहे. हिरवळ परिसरामध्ये असलेल्या प्रकल्पाची डिझाइन समकालीन आहे. २-बीएचके व ३-बीएचके सदनिका परिपूर्ण काम-जीवन संतुलन देतात, ज्यामुळे रहिवाशी दिवसभरातील व्यस्त कामकाजानंतर स्वत:ला पुन्हा उत्साहित करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून उत्साहाने नवीन दिवसातील आव्हानांचा सामना करण्यास सज्ज होऊ शकतात. मरीना एन्क्लेव्ह हा प्रकल्प वैयक्तिक जागेपेक्षा अधिक आहे. हे एक नवीन विश्व आहे, जेथे मन, शरीर व आत्मीय समाधानासाठी दैनंदिन जीवनातील त्रासाला विसरून जात इतर काहीतरी उत्साहपूर्ण बाबींचा आनंद घेण्याची संधी मिळते.