मुंबई, २१ डिसेंबर २०२२: प्रगतीशील आणि शाश्वत शहरात शिक्षण घेऊ इच्छिणार्यांसाठी कॅनबेरा हे सर्वात प्राधान्य शहर असले पाहिजे. ऑस्ट्रेलियाचे राजधानी शहर देशाच्या शाश्वततेच्या मोहिमेमध्ये अग्रस्थानी आहे आणि २०४५ पर्यंत शून्य निव्वळ उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी शहराने शाश्वत ऊर्जेमध्ये २ बिलियन डॉलर्स ($2 billion) गुंतवणूक केली आहे आणि तज्ञांच्या मते, शाश्वततेच्या दिशेने हा महत्त्वाकांक्षी पुढाकार क्लीनटेक आणि नवीकरणीय उर्जा उद्योगामध्ये रोजगाराच्या उत्साहवर्धक संधी निर्माण करत आहे.
बिझनेस कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियाचा अंदाज आहे की, निव्वळ शून्य उत्सर्जनाप्रती पुढाकारामुळे पुढील ५० वर्षांत ऑस्ट्रेलियामध्ये १९५,००० हून अधिक रोजगार (195,000 jobs in Australia over the next 50 years) निर्माण होतील. नुकतेच क्लायमेट कौन्सिलने सुचवले की, रिन्यूएबल एनर्जी स्टोरेज टारगेट नवीकरणीय ऊर्जेमध्ये जवळपास १००,००० रोजगार (100,000 jobs) निर्माण करू शकते.
नवीनकरणीय ऊर्जा संशोधन व विकासामधील अग्रस्थान, तसेच व्यापक स्थिर अत्यावश्यक गोष्टींना पाठिंबा देणारे प्रबळ उच्च शिक्षण नेटवर्क असल्यामुळे कॅनबेरामध्ये या क्षेत्रांत ऑफर करण्यासाठी अधिकाधिक रोजगार असतील.
‘‘कॅनबेरा हे प्रबळ शहरी नियोजन पाया असलेले ऑस्ट्रेलियातील अद्वितीय शहर आहे आणि या शहराने शिक्षण, संशोधन, उद्योग आणि सरकार अशा अनेक क्षेत्रांमध्ये सहयोगाला प्रेरित केले आहे. यामुळे उत्तमरित्या सुनियोजित, उपलब्ध होण्याजोग्या आणि शाश्वत शहराप्रती हातभार लागला आहे,’’ असे कॅनबेरा युनिव्हर्सिटी इमेरिटा प्रोफेसर बार्बरा नॉर्मन म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘अधिक शाश्वत भविष्याकडे महत्त्वाच्या जागतिक बदलासह नाविन्यपूर्ण उपायांचा भाग होण्याच्या संधी आहेत, ज्यांचा कॅनबेरा, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर प्रभाव पडेल.’’
कॅनबेरामध्ये जाण्यास स्वारस्य असलेले विद्यार्थी ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम-रँक असलेल्या काही युनिव्हर्सिटींमध्ये शिक्षण घेण्याची निवड करू शकतात. कॅनबेरामधील युनिव्हर्सिटीज संशोधन, शिक्षण, भविष्यातील कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान सादरीकरणांना सक्षम करत आहेत.
कॅनबेरा हवामान बदलावर उपाययोजना करण्यात आघाडीवर आहे. १०० टक्के नवीकरणीय ऊर्जा पुरवठा करणारे हे ऑस्ट्रेलियातील पहिले शहर आहे. अलीकडेच शहराने कमी-कार्बन अर्थव्यवस्थेच्या दिशेने अनेक उपक्रम राबवले, ज्यात ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी बॅटरी स्टोरेज सिस्टम तयार करणे आणि नवीकरणीय ऊर्जा व स्वच्छ टेक इनोव्हेशन हब विकसित करणे समाविष्ट आहे. कॅनबेराने नेक्स्ट-जनरेशन रिन्यूएबल हायड्रोजन व स्टोरेज तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जागतिक कंपन्यांसोबत सहयोग केला आहे आणि लोकांना शून्य-उत्सर्जन वाहने निवडण्यासाठी इन्सेटिव्ह्ज देखील वाढवत आहे.
या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी स्थानिक सरकार गुंतवणूक करत आहे आणि त्यासाठी आर्थिक इन्सेटिव्ह्ज देत आहे. हा भविष्यकालीन दृष्टिकोन जागतिक स्वारस्य आणि जागतिक कंपन्यांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामुळे अधिक रोजगार व दीर्घकालीन करिअरच्या संधी निर्माण होतील. सध्या, कॅनबेरा शहर ऑस्ट्रेलियामधील नवीकरणीय ऊर्जा रोजगारांसंदर्भात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हवामान बदलाप्रती कॅनबेराचा जागतिक-अग्रणी प्रतिसाद समुदायासाठी आवश्यक आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी अधिक संधी निर्माण होतात. तुम्ही अधिक शाश्वत जीवन जगत तुमचे करिअर घडवण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे.