IND vs BAN 1st Test 2022: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला गेला. शेवटच्या दिवशी भारताने बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. भारताने आता मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताकडून चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांनी अप्रतिम कामगिरी केली. या मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते आणि या विजयासह भारताने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे एक पाऊल टाकले आहे. आता भारताला उरलेल्या पाचपैकी चार कसोटी जिंकायच्या आहेत.