मॅरिबोरो ऑस्ट्रेलियाच्या महत्वाच्या भागात येते. या भागामध्ये १९ व्या शतकात सोन्याच्या मोठमोठ्या खाणी होत्या.आता कधी इथे बऱ्याचवेळा लोकांना लहान मोठे सोन्याचे दगड मिळतात. परंतु डेविड यांच्या हाती त्याहूनही मोठा खजिना लागला. डेविड यांनी सापडलेला दगड फोडण्याचे, कापण्याचे, तोडण्याचे प्रयत्न केले. पण दगड आहे तसा राहिला.
२०१५ मध्ये सापडलेला दगड डेविड यांनी स्वतःकडे जपून ठेवला होता. काही वर्ष लोटल्यानंतर डेविड तो दगड घेऊन मेलबर्न म्युझियममध्ये घेऊन गेले.
त्यावेळी संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, डेव्हिड दगड समजत असलेली वस्तू दगड नसून दुर्मिळ उल्कापिंड होती. दुसऱ्या जगातून ते ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर पडलं होत.
डेविड यांना सापडलेले उल्कापिंड फार मौल्यवान असल्याचे मेलबर्न म्युझियमचे जियोलॉजिस्ट डर्मोट हेन्नी यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, डेविड यांना सापडलेल्या उल्कापिंडाची किंमत ठरवताच येणार नाही, अशक्य आहे. कारण त्यात असलेला धातू पृथ्वीवर मिळतच नाही.
गेल्या ३७ वर्षांपासून हेन्नी म्युझियममध्ये कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी बऱ्याच दगडांची तपासणी केली आहे.
हेन्नी यांनी सांगितले, मी आत्तापर्यंत हजारो उल्कापिंडाची तपासणी केली आहे. डेविड यांना सापडलेला उल्कापिंड फार मौल्यवान आहे. त्यांची किंमत ठरवू शकत नाही.
हेन्नी यांनी डेविड यांना सापडलेल्या उल्कापिंडाची तपासणी केली. हे उल्कापिंड जवळपास ४६०कोटी वर्ष जुने आहे. त्याचे वजन १७ किलो आहे.
हेन्नी हे ही म्हटले की, जर उल्कापिंड कापायचं असल्यास हिरे कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेचा वापर करावा लागेल.