नवी दिल्ली : उत्साहाला मोल नसते. डेमो पाहून मीही करणार असा आता मनुष्य भाव झाला. आता तर लग्नाअगोदर प्रिविडींग जमाणा आला आहे. पुर्वी लग्नाची हळदी समारंभ फार फार जोमात होत. लग्न मात्र धुमधडाक्यात होत असत. पण प्रिय विडींग चा खर्च ही आता लाखोंच्या घरात जाऊ लागला आहे. लग्नाची बात तर कुछ औरच. असो..
कोरोनाच्या उद्रेकानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा दिवाळीसारखे सण देशात मोठ्या उत्साहात साजरे झाले आहेत. त्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण असताना, आता लग्नसराईला सुरुवात झाली आहे. येत्या 41 दिवसांत लग्नांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामुळे व्यापारी चांगलेच मालामाल होणार असून, केवळ लग्नसराईमध्ये 3.75 लाख कोटी रुपयांची कमाई होणार असल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स(CAIT) कडून सांगण्यात येत आहे.
32 लाख शुभमंगलं होणार
तुळशी विवाहानंतर साधाराणपणे विवाहइच्छुकांच्या विवाहांना सुरुवात होते. त्यामुळे देशभरात येत्या 41 दिवसांमध्ये सर्वाधिक 32 लाख शुभमंगलं होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये 5 लाख विवाहांसाठी प्रत्येकी 3 लाख रुपये, 10 लाख विवाहांसाठी प्रत्येकी 5 लाख रुपये, 10 लाख विवाहांसाठी प्रत्येकी 10 लाख तर 5 लाख विवाह सोहळ्यांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये खर्च होणार असल्याचे CAIT ने एका अभ्यासानुसार सांगितले आहे. ही सर्व आकडेवारीवर आधारित आहे. काही अनोंदणीकृत, तसेच अनधिकृत होणारे बाल विवाह आदींवरील खर्च पकडला तर त्यात अजून काही लाख कोटींची भर पडू शकते.
तसेच शाही लग्नसमारंभांमध्ये 50 हजार लग्नांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये आणि इतर 50 हजार लग्नांसाठी प्रत्येकी 50 हजार, तसेच आणखी 50 हजार लग्नांसावर प्रत्येकी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यात येणार आहेत.
या वस्तूंच्या मागणीत होणार वाढ
तसेच 15 नोव्हेंबरपासून फेब्रुवारी 2023 पर्यंत या विवाहसोहळ्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे लग्नाच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी लाटताना दिसणार आहे. या काळात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे,जीवनावश्यक वस्तू आणि सोने व सोन्याच्या वस्तूंची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात येते. लग्नसराईत स्वयंपाकाचे तेल,डाळी,तांदूळ,साखर यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे विक्रेते देखील या वस्तूंची साठेबाजी करू लागले आहेत.