-
३१५ किलोमीटर्सचा वाढीव एआरएआय प्रमाणित पल्ला
-
आकर्षण आणखी वाढवण्यासाठी देऊ करत आहे १० नवीन स्मार्ट फीचर्स
-
मल्टि-मोड रिजेन, झेडकनेक्ट हे कनेक्टेड कार तंत्रज्ञान, आय-टीपीएमएस आणि टायर पंक्चर दुरुस्तीचे किट हे सगळे आता सर्व श्रेणींमधील कार्ससोबत उपलब्ध आहे
-
सध्याच्या टिगोर.ईव्ही ग्राहकांना सॉफ्टवेअर अपडेट केल्यास २० डिसेंबर, २०२२ पासून टाटा मोटर्सच्या अधिकृत सेवा केंद्रांवर या सर्व सुविधा विनाशुल्क उपलब्ध करून दिल्या जातील
मुंबई, नोव्हेंबर २४, २०२२: आपल्या न्यू फॉरएव्हर तत्त्वाशी सुसंगती राखत टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीने नवीन टिगोर.ईव्ही सेदान ३१५ किलोमीटर्सच्या वाढीव पल्ल्यासह (एआरएआय प्रमाणित) तसेच अनेक अव्वल दर्जाच्या व तंत्रज्ञानात्मक सुविधांसह, आज बाजारात आणली. आता मॅग्नेटिक रेड या रंगाच्या नवीन पर्यायात उपलब्ध असलेली टिगोर.ईव्ही, नवीन अपहोल्स्ट्री, लेदरच्या आच्छादनातील स्टीअरिंग व्हील, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प व क्रुइझ कंट्रोल या नवीन सुविधांसह अधिक आरामदायी झाली आहे. याशिवाय मल्टि-मोड रिजेन, झेडकनेक्ट हे कनेक्टेड कार तंत्रज्ञान, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, आय-टीपीएमएस व टायर पंक्चर दुरुस्तीचे किट अशा अनेक स्मार्ट सुधारणांचा अधिक तंत्रज्ञानात्मक अनुभव ग्राहकांना दिला जाणार आहे. या सर्व सुविधा सर्व श्रेणींमधील कार्ससोबत देऊ केल्या जाणार आहेत.
टाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा यांच्या मते, “ईव्ही उद्योगात प्रचंड मोठी वाढ होत आहे आणि भारतीय बाजारपेठेत लोकप्रियताही प्राप्त करत आहे. टाटाच्या ५०,००० ईव्ही गाड्या सध्या रस्त्यांवर आहेत आणि या बाजारपेठेचा ८९ टक्के वाटा (वायटीडी) आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्ही अर्थात टाटा मोटर्स, आमच्या विस्तृत पोर्टफोलिओद्वारे या बदलाला एकहाती चालना देत आहोत. ईव्ही बाजारपेठ जास्तीत-जास्त ग्राहकांसाठी खुली करण्याच्या उद्देशाने नुकत्याच बाजारात आणलेल्या टिअॅगो.ईव्हीला तुफान प्रतिसाद मिळत आहे. लाँचनंतर केवळ महिनाभराच्या काळात या गाडीसाठी २० हजारांहून अधिक बुकिंग्ज झाली आहे हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या न्यू फॉरएव्हर या तत्त्वाशी सुसंगती राखत आता टिगोर.ईव्ही देखील अधिक तंत्रज्ञानात्मक तसेच अव्वल सुविधांसह अद्ययावत करण्याची वेळ आली होतीच. भारतीय रस्त्यांवर कापलेल्या ६०० दशलक्ष किलोमीटर अंतरातून प्राप्त झालेल्या ग्राहकांच्या ड्रायव्हिंग नमुन्यांबाबतच्या सखोल माहितीचा, आम्हाला अधिक कार्यक्षमता व पल्ला काय आहे हे समजून घेण्यात व त्यानुसार उत्पादन देण्यात, उपयोग झाला. आमची ३१५ किलोमीटर एवढ्या वाढीव पल्ल्याची (एआरएआय प्रमाणित) नवीन ‘टिगोर.ईव्ही- मोर टेक, मोर लग्झ, मोर ईव्ही’ तुमच्यापुढे सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”
नवीन टिगोर.ईव्ही खालील ट्रिम्समध्ये उपलब्ध होणार आहे:
आहे:
टिगोर ईव्ही ट्रिम्स | दर (सर्व किमती एक्स-शोरूम भारत, रूपयांमध्ये) |
एक्सई | १२,४९,००० |
एक्सटी | १२,९९,००० |
एक्सझेडप्लस | १३,४९,००० |
एक्सझेड प्लस लग्झ | १३,७५,००० |
नेक्सॉन ईव्ही प्राइमप्रमाणेच सध्याच्या टिगोर.ईव्ही मालकांनाही सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून ही फीचर्स विनाशुल्क देण्याचे धोरण टाटा मोटर्सने ठेवले आहे. ग्राहक त्यांची वाहने मल्टि-मोड रिजनरेशन्स, आय-टीपीएमस व टायर पंक्चर दुरुस्ती किटसह अद्ययावत करून घेऊ शकतात. याशिवाय, एक्सझेड+ व एक्सझेडप्लस+ डीटीचे सध्याचे ग्राहक स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी अपग्रेडही प्राप्त करू शकतात. टाटा मोटर्सच्या कोणत्याही अधिकृत सेवा केंद्रावरून २० डिसेंबर २०२२ पासून या सेवा उपलब्ध करून घेतल्या जाऊ शकतात.
अप्रतिम रचना, आपल्या वर्गातील सर्वाधिक सुरक्षितता आणि याला मिळालेली आरामदायी अंतर्गत रचना व सर्वोत्तम कामगिरी जोड यांनी सुसज्ज अशी टिगोर.ईव्ही, ५५ किलोवॉटची सर्वोच्च ऊर्जा निष्पत्ती व १७० एनएमचा सर्वोच्च टॉर्क, निर्माण करते. या कारला २६-केडब्ल्यूएच क्षमतेच्या उच्च ऊर्जा घनतेच्या बॅटरी पॅक्सची शक्ती आहे. शिवाय आयपी६७ रेटेड बॅटरी पॅक व मोटरही यात आहे. यामुळे ही कार कोणत्याही हवामानात उत्तम कामगिरी करू शकते व ग्राहकाकडे चिंतेचे कारण उरत नाही.
टिगोर.ईव्हीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ग्राहकांनी कृपया पुढील लिंकला भेट द्यावी https://tigorev.tatamotors.com/ किंवा आपल्या जवळच्या डीलरशिपला भेट द्यावी.
माध्यम संपर्क माहिती: टाटा मोटर्स कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स: +९१ २२-६६६५७६१३ / indiacorpcomm@tatamotors.com