औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर कायगावजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहे. कायगाव येथे स्विफ्ट आणि वॅगनार कारची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वागनांचा चुराडा झाला. स्थानिकांना याबाबत माहिती मिळताच पोलीस दुर्घटनास्थळी दाखल झाले.
अपघातामध्ये ४ जणांचा मृत्य, पाच जण जखमी
पोलीस दाखल झाल्यावर जखमींना बाहेर काढण्यात आले. यामध्ये चार जणांनी जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर झाले आहेत. यांना जवळच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रतन शांतीलाल बेडवाल(३८), सुधीर पाटील(५०), रावसाहेब मोठे(५०), भाऊसिंग गिरासे(४५) यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर शशीकला भाऊराव कोराट(७०), सिद्धार्थ जंगले (१४), हेमंत जंगले (५५), छाया हेमंत जंगले (३५), कुंतला दिगंबरराव जंगले(७०) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.