मुंबई: विश्वातील उल्लेखनीय वास्तविकतांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्यांना अचंबित करणारी तथ्ये सांगण्यासाठी सोनी बीबीसी अर्थ कन्टेन्टचे उत्साहवर्धक लाइन-अप घेऊन येत आहे, ज्यामधून तुम्हाला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अद्भुत विश्वाचा अनुभव मिळेल. चॅनेल शो ‘आइसलँड विथ अलेक्झांडर आर्मस्ट्रॉंग’मध्ये सूर्य कधीच मावळत नाही अशा ग्लेशियर्स व गिझर्सच्या भूमीचा अनुभव देण्यास सज्ज आहे. तसेच त्यांना ‘कोस्टल फिशिंग विथ रॉबसन ग्रीन’सह ब्रिटीश नद्यांचा अनुभव घेण्याची संधी मिळेल आणि ‘सायन्स ग्रेटेस्ट मिस्टरीज’सह काही सर्वात वैज्ञानिक रहस्यांचा उलगडा पाहायला मिळेल.
आइसलँडमध्ये असलेल्या अभूतपूर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी आणि उगम पावणारे गिझर्स पाहण्यासाठी अलेक्झांडर आर्मस्ट्रॉंग त्याचा शो ‘आइसलँड विथ अलेक्झांडर आर्मस्ट्रॉंग’मध्ये उल्लेखनीय ग्लेशियर्सना (हिमनद्या) भेट देतो आणि उकळत्या पाण्यात ब्रेड भाजणाऱ्या एका माणसाला भेटतो. तो तुम्हाला रेकजाविकच्या गजबजलेल्या रस्त्यांमधून देखील घेऊन जातो, आजुबाजूला खेळत आणि जगातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचे नमुने देखील घेतो. दुसरी सिरीज ‘कोस्टल फिशिंग विथ रॉबसन ग्रीन’मध्ये रॉबसन ग्रीन यूकेमध्ये फेरफटका मारतो. रॉबसन अशा समुद्रातून आपली उपजीविका करत असलेल्या आणि ब्रिटीश नद्यांमध्ये सर्वात मोठ्या, जंगली व चवदार माशांच्या शोधात घेणाऱ्या लोकांना भेटतो.
नवीन सापडलेले गूढ व आव्हाने उलगडत ‘सायन्स ग्रेटेस्ट मिस्टरीज’ आपले विश्व किती जुने आहे? चंद्राच्या दोन बाजू इतक्या वेगळ्या का आहेत? अवकाशातील लोखंड तुतानखामनच्या शरीराजवळ कसे आले? यासारख्या जटिल प्रश्नांची उत्तरे देते. या सिरीजमधील प्रत्येक एपिसोड एक प्रश्न हाताळतो आणि समर्पित शास्त्रज्ञांच्या टीमसह लक्षवेधक प्रयोग चालवणाऱ्या अत्याधुनिक प्रयोगशाळांबद्दल माहिती देतो. आकर्षक संगणक-निर्मित इमेजरी असलेली ही सिरीज लुप्त जग, प्राचीन सभ्यता आणि विश्वाचा दूरचा विस्तार एका भव्य व्हिज्युअल स्वरूपात स्क्रीनवर आणते.
तर मग, कशाची वाट पाहत आहात? या नोव्हेंबरमध्ये सोनी बीबीसी अर्थच्या रोमांचक कन्टेन्ट पोर्टफोलिओमधील भव्य शोज पाहण्यासाठी सज्ज राहा!
पहा ‘कोस्टल फिशिंग विथ रॉबसन ग्रीन’ ७ नोव्हेंबरपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता, ‘सायन्स ग्रेटेस्ट मिस्टरीज’ २१ नोव्हेंबरपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता, ‘आइसलँड विथ अलेक्झांडर आर्मस्ट्रॉंग’ २८ नोव्हेंबरपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्त सोनी बीबीसी अर्थवर!