यंदा जागतिक मधुमेह दिनाची थीम ‘मधुमेहाबाबत माहितीची उपलब्धता’ आहे, ज्यामागे मधुमेहाची माहिती अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यास साह्य करण्याचा मनसुबा आहे. डायबिटीज मेलिटस (डीएम) च्या वाढत्या प्रमाणाला प्रकाशझोतात आणण्यासाठी इंडस हेल्थ प्लस या प्रतिबंधात्मक हेल्थकेअरमधील अग्रणी कंपनीने केलेल्या हेल्थकेअर तपासण्यांच्या आधारावर रक्तातील शर्करेच्या पातळीशी संबंधित ट्रेण्ड्सचे निरीक्षण केले आहे. या संशोधनामध्ये ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ पर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आल्या, ज्यामधून निदर्शनास येते की २३ टक्के व्यक्तींना मधुमेह आहे आणि चाचणी करण्यात आलेल्या ३२ टक्के व्यक्ती बोर्डरलाइन किंवा प्रीडायबेटिक रेंजवर होते, म्हणजेच त्यांची पातळी १०० ते १२५ mg/dl दरम्यान होती.
आरोग्य तपासणी डेटाबाबत इंडस हेल्थ प्लसचे जेएमडी व प्रीव्हेन्टिव्ह हेल्थकेअर स्पेशालिस्ट श्री. अमोल नायकवडी म्हणाले, “भारताला जगातील मधुमेहाची राजधानी मानली जाते आणि याला सामोरे जाण्यासाठी इंडस हेल्थ प्लस नेहमीच व्यक्तींना लवकर तपासणी व आजारावर वेळेवर उपचार करण्याच्या महत्त्वाबद्दल शिक्षित करण्यासाठी अनेक जागरुकता मोहिमा राबवते. आरोग्यदायी जीवनशैली, आहार नियंत्रण आणि जीवनशैलीतील बदल यांसारखे सुधारात्मक उपाय अंमलात आणल्यास आधीच मधुमेह असलेल्या व्यक्तींना या आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. लठ्ठपणा, कौटुंबिक इतिहास, बैठी जीवनशैली, गरोदरपणात शुगर वाढल्याचा इतिहास असणार्या व्यक्तींना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो आणि त्यांना रक्तातील शर्करेची पातळी नियमितपणे निरीक्षण करण्याच्या महत्त्वाविषयी समुपदेशन केले पाहिजे. जीवनशैलीच्या कारणांमुळे या आजाराची सुरुवात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच जनुकीय चाचणी देखील उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींचे निदान करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.’’
संशोधनानुसार पुढील प्रमुख निष्पत्ती निदर्शनास आले.
नमुना आकार: ९०००
• करण्यात आलेल्या सर्व तपासण्यांमध्ये २५ टक्के पुरूषांना व २० टक्के महिलांना मधुमेह होता आणि तपासणी करण्यात आलेले ३२ टक्के पुरूष व ३१ टक्के महिला बोर्डरलाइनवर होते.
• यामागील मुख्य कारण म्हणजे तणाव, लठ्ठपणा, साखरेचे सेवन, मद्यपान, जंक फूडचे सेवन आणि पुरेशा प्रमाणात व्यायाम न करणे.
• महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये या आजाराचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले आहे.
प्लाझ्मा ग्लुकोज (उपाशी पोटी)
स्थिती महिला पुरूष एकूण
नॉर्मल ४९ टक्के ४३ टक्के ४६ टक्के
बोर्डरलाइन ३१ टक्के ३२ टक्के ३२ टक्के
अॅब्नॉर्मल २० टक्के २५ टक्के २३ टक्के
एकूण १०० टक्के १०० टक्के १०० टक्के
एचबीए१सी
स्थिती महिला पुरूष एकूण
नॉर्मल ५० टक्के ४९ टक्के ५० टक्के
बोर्डरलाइन २७ टक्के २६ टक्के २६ टक्के
अॅब्नॉर्मल २३ टक्के २५ टक्के २४ टक्के
एकूण १०० टक्के १०० टक्के १०० टक्के
इंडस प्लस डेटानुसार त्याच डेटा कालावधीसाठी इंडस हेल्थ प्लसने केलेल्या एचबीए१सी च्या चाचणीच्या निष्पत्ती २६ टक्के बोर्डरलाइन किंवा प्रीडायबेटिक आणि २४ टक्के डायबेटिक रेंजमधील असल्याचे दिसून आले.
###
इंडस हेल्थ प्लस प्रा. लि. ही आयएसओ 9001: 2015 कंपनी आहे, जी दर्जेदार आरोग्यसेवा सर्वांसाठी ‘अव्हेलेबल, अॅक्सेसिबल व अफोर्डेबल’ करण्याप्रती कटिबद्ध आहे. इंडसने भारतातील ७८ हून अधिक शहरांमधील उत्तमरित्या सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पिटल्स व डायग्नोस्टिक लॅब्ससह धोरणात्मक सहयोग केले आहेत आणि कंपनीचे १२२ हून अधिक सेंटर्स आहेत.
स्क्रिनिंग टेस्टच्या माध्यमातून आजारांचे लवकर निदान केल्यास जीवन वाचण्यासोबत व्यक्ती व त्याच्या कुटुंबियांचे प्रचंड शारीरिक, भावनिक व आर्थिक तणावापासून देखील संरक्षण होते. नियमित तपासणी व फॉलो-अप्सची शिफारस केली जाते.