पोस्टर्स बनवण्याच्या अनोख्या सर्जनशील उपक्रमात जवळपास ३५० रेडियोलॉजी कर्मचाऱ्यांचा उस्फुर्त सहभाग
पुणे, नोव्हेंबर २०२२: डायग्नोस्टिक्स अर्थात आजारांचे निदान करण्यासाठी पुरवल्या जाणाऱ्या सेवासुविधांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी कृष्णा डायग्नोस्टिक्सने (बीएसई: 543328, एनएसई: KRSNAA) ८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावर पोस्टर डिझाईन उपक्रमाचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय रेडियोलॉजी दिवस साजरा केला. भारतभरातील जवळपास ३७० रेडियोलॉजी कर्मचाऱ्यांनी यामध्ये भाग घेऊन, वेगाने वृद्धिंगत होत असलेल्या आरोग्यसेवा रोगनिदान क्षेत्रात रेडियोलॉजीचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आपले योगदान दिले. यावेळी ९५ पोस्टर चित्रे तयार करण्यात आली, आंतरराष्ट्रीय रेडियोलॉजी दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर जागरूकता घडवून आणण्याचा हेतू यामुळे यशस्वी झाला आहे. यंदाच्या वर्षी कृष्णा डायग्नोस्टिक्सने हा विशेष दिवस मान्यता, जागृती आणि स्फूर्ती या तीन प्रेरणादायी मूल्यांना अधोरेखित करून साजरा केला.
याच दिवशी जर्मन शास्त्रज्ञ विल्हेल्म कोनराड रोएंटजेन यांनी एक्स-रेचा शोध लावला, त्याचे प्रतीक म्हणून जगभरात ८ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय रेडियोलॉजी दिवस म्हणून साजरा केला जातो. यादिवशी सर्व रेडियोलॉजिट्स, रेडियोग्राफर्स, रेडियोलॉजिकल तंत्रज्ञ, याच्याशी संबंधित क्षेत्रांतील व्यावसायिक आणि रुग्णांचे समूह एकत्र येतात आणि रुग्णाच्या संपूर्ण प्रवासात रेडियोलॉजी बजावत असलेल्या भूमिकेच्या योगदानाविषयी विचार मांडतात, रेडियोलॉजीला प्रोत्साहन देतात.
भारतामध्ये रेडियोलॉजी आणि रोगनिदान सेवा एकाच ठिकाणी पुरवणारी कृष्णा डायग्नोस्टिक्स ही सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या ही कंपनी भारतातील १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये २००० पेक्षा जास्त ठिकाणी कार्यरत आहे.
कंपनीचे कार्यकारी संचालक श्री. यश मुथा यांनी सांगितले, “सर्वोत्तम रेडियोलॉजी सेवा पुरवून आपल्या समाजाच्या आरोग्यसेवा मागण्या पूर्ण करण्यात कृष्णा डायग्नोस्टिक्स नेहमीच आघाडीवर असते. हे वर्ष आमच्यासाठी खूप खास आहे कारण आम्ही रिटेल उद्योगक्षेत्रात पदार्पण केले आहे. समाजाची सेवा करत असताना आंतरराष्ट्रीय रेडियोलॉजी दिवस साजरा करू शकलो ही आमच्यासाठी आदर्शाचा प्रसंग आहे.”
उपाध्यक्ष डॉ अभिजित पाटील म्हणाले, “हा उपक्रम यशस्वी आणि संस्मरणीय बनवण्यासाठी योगदान दिल्याबद्दल आम्ही आमचे सर्व डॉक्टर और कर्मचाऱ्यांचे आभारी आहोत. या उपक्रमामुळे आपल्या आरोग्यसेवा व्यवस्थेमध्ये रेडियोलॉजीचे महत्त्व अधिक वाढण्यात मोलाची मदत होईल.”