राएसएसडीआयद्वारे मुंबई ते पुणे पर्यंत रक्तातील साखर तपासणी शिबिरे
मुंबई: आरएसएसडीआय या मधुमेह अभ्यासातील अग्रगण्य रिसर्च सोसायटीने आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त “वॉकाथॉन” या मेगा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जुहू बीच, मुंबई येथे समुद्रकिनारी मधुमेहाच्या रुग्णांना शिक्षित करण्यासाठी या कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागातही अनेक स्क्रीनिंग शिबिरे आयोजित करण्यात आली होती. २०२२ च्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त जागरूकता पसरवण्यासाठी त्यांनी मधुमेह जागरूकता वेबिनार आणि सोशल मीडिया मोहिमा देखील आयोजित केल्या. आयएमए मुंबई वेस्ट आणि मुंबई डायबिटीज केअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, आरएसएसडीआय महाराष्ट्र चॅप्टरने मुंबईत एका खास आरोग्यदायी नाश्ताची व्यवस्था केली. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आरोग्यदायी नाश्त्याच्या पर्यायांबद्दल लोकांना माहिती देण्याचा हा एक अनोखा उपक्रम होता.
चर्चेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मधुमेहाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही या वॉकथॉनचे आयोजन केले. यामध्ये सामील होण्यासाठी आणि मधुमेहाचे निदान झालेल्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यात आम्हाला मदत करण्यात असा सहभाग पाहून आम्हाला आनंद झाला. आरएसएसडीआयचे मुख्य उद्दिष्ट लोकांना रोगाबद्दल शिक्षित करणे आणि वेळेवर निदान उपक्रम राबविणे हे आहे, असे आरएसएसडीआयचे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. मनोज चावला म्हणाले.
आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये लोकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि मोफत रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब आणि वजन तपासणीचा लाभ घेतला. “मधुमेहाला हरवण्यासाठी मधुमेहासोबत जगणे शिकणे महत्त्वाचे आहे. जेव्हा सामान्य लोकांमध्ये नियमित आरोग्य तपासणीची सवय लावली जाते आणि लवकर निदान केले जाते तेव्हाच हे साध्य होऊ शकते. म्हणूनच आरएसएसडीआय देशभरात विविध स्क्रीनिंग शिबिरे आयोजित करण्यात, जीवनाच्या आवश्यक गोष्टी बनण्यासाठी नियमित आरोग्य तपासणीस प्रोत्साहन देण्यासाठी चिकाटीने काम करत आहे, असे मधुमेहतज्ज्ञ आणि आरएसएसडीआयचे माजी अध्यक्ष डॉ. शशांक जोशी म्हणाले. सध्या ते आएडीएफ एसईए क्षेत्राचे अध्यक्ष आहेत.
आरएसएसडीआय देशभरात रक्तातील शुगर तपासणीसाठी अनेक शिबिरे आयोजित करून जागतिक मधुमेह दिन पाळत आहे. आम्ही आमच्या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये एक मेगा डायबिटीज वॉकाथॉन उपक्रम आयोजित केला आहे आणि लोकांना मधुमेहाच्या विविध पैलूंबद्दल शिक्षित करत आहोत. मधुमेहाच्या रुग्णांची संख्या भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याने, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, असे डायबेटोलॉजिस्ट आणि आरएसएसडीआयचे मानद सचिव डॉ. संजय अग्रवाल म्हणाले.
मधुमेह मेलीटस हे भारतातील सर्वात प्रमुख आरोग्य सेवा आव्हान बनले आहे. भारतातील ७० दशलक्षाहून अधिक लोक सध्या मधुमेहाने त्रस्त आहेत. आरएसएसडीआयचा असा विश्वास आहे की या आव्हानावर मात करण्यासाठी उपचारात्मक ते प्रतिबंधात्मक उपायांकडे दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे आणि ते लागू करण्यावर लक्ष केंद्रित करते.