मुंबई, 05 नोव्हेंबर : मुंबईत पुन्हा एकदा आगीची दुर्घटना घडली आहे. आझाद मैदानाला लागून असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये एका दुकानाला आग लागली आहे. या आगीमध्ये दुकान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी न झाल्यााचे वृत्त आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये आगीची घटना घडली आहे. आज दुपारच्या सुमारास एका दुकानाला आग लागली.
त्यामुळे शेजारी असलेल्या इतर दुकानांनाही आग लागली. धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.