बल्गेरिया : बल्गेरियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या (Baba Vanga’s Predictions) अनेकदा चर्चेत असतात. मृत्यूपूर्वी बाबा वेंगा यांनी २०२३ या वर्षासाठी अनेक महत्त्वाच्या भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी पृथ्वीची कक्षा (Earth’s Orbit) बदलणार असल्याचे सांगितले होते. बाबा वेंगा यांनी १११ वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यापैकी अनेक खरे ठरल्या आहेत.
२०२३ मध्ये पृथ्वीची कक्षा बदलेल…
५०७९ मध्ये जगाचा अंत होईल : बाबा वेंगा
बाबा वेंगांच्या अंदाजानुसार, अंतराळवीर २०२८ मध्ये शुक्रावर पोहोचू शकतात. इतकंच नाहीतर २०४६ मध्ये अवयव प्रत्यारोपणाच्या मदतीने लोक १०० वर्षांहून अधिक जगू शकतील. बाबा वेंगा यांनीही जगाच्या अंताची भविष्यवाणी केली होती आणि ५०७९ साली जगाचा अंत होईल असे सांगितले होते.
या वर्षी भारतात येऊ शकते उपासमारीची वेळ…
द सनच्या वृत्तानुसार, बाबा वेंगा यांनी १११ वर्षांपूर्वी २०२२ मध्ये भारतात उपासमारीची भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी जगभरातील तापमानात घट होईल आणि त्याचा परिणाम भारतावरही दिसून येईल. कमी तापमानामुळे कीटकनाशकांचा प्रादुर्भाव वाढेल. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. पीक निकामी झाल्यामुळे परिस्थिती अत्यंत वाईट होऊ शकते आणि उपासमारीची परिस्थिती उद्भवू शकते, असंही त्यांनी म्हटलं होतं.