मुंबई, २७ सप्टेंबर, २०२२: टूथसी या भारतातील आघाडीच्या स्माईल मेकओव्हर ब्रँडने अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून घोषणा केली ज्यामुळे नवीन-युगातील दात सरळ करणार्या क्लिअर अलाइनरचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. स्टार पॉवर कपल सर्व प्रमुख बाजारपेठांमधील ग्राहकांशी संपर्क निर्माण करण्यासाठी ब्रँडसोबत काम करेल.
ज्या देशात दातांची चुकीची संरेखन आणि स्मित समस्या फारशा गांभीर्याने घेतल्या जात नाहीत, टूथसीने या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी पाऊल उचलेले आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे नेहमीच आरोग्य आणि आत्मविश्वासाचे भक्कम समर्थक राहिले आहेत जे टूथसीच्या मिशनला अनुसरून आहेत. कंपनी स्पष्ट अलाइनरच्या स्वरूपात आधुनिक, तंत्रज्ञान-समर्थित सोल्यूशन ऑफर करते जे विश्वासू आहेत आणि सहा ते आठ महिन्यांत दात सरळ करण्यासाठी घरच्या घरी वापर करू शकता येतात. याव्यतिरिक्त, ग्राहक ब्रँडच्या अॅपद्वारे स्कॅन बुक करू शकतात, माहिती मिळवू शकतात आणि उपचारांच्या प्रगतीचे निरीक्षण करू शकतात.
“विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही प्रतिभावान जोडी तरुणाईला आत्मविश्वास देते ज्याद्वारे टूथसी चे उद्देश सहजपणे सध्या होऊ शकतात. धाडसी आणि अत्यंत प्रतिभावान अनुष्का आणि विराट, त्यांच्या सुंदर स्मितहास्यांसह आणि उत्साही व्यक्तिमत्त्व आमच्या ब्रँडसाठी योग्य आहेत. आमचा सर्वांचा विश्वास आहे की आम्ही ब्रँडला पुढील स्तरावर नेऊ शकतो आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दात सरळ करण्याच्या उपायांबद्दल जागरूकता निर्माण करू शकतो,” डॉ अर्पी मेहता शाह, सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), टूथसी यांनी सांगितले.
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणाली, “आम्ही टूथसीसोबत काम केले आहे कारण ते त्यांच्या स्मितहास्य बदलू पाहणार्या लोकांसाठी एक सोपा पण साधा सरळ उपाय देते.”
आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स आयडॉल विराट कोहली पुढे म्हणाला, “माझ्यासाठी केवळ क्रिकेटच्या खेळातच नाही तर माझ्या आयुष्याच्या सर्व पैलूंमध्ये यश मिळवण्यासाठी विश्वास आणि विश्वासार्हता महत्त्वाची आहे. स्माईल मेकओव्हरच्या शोधात असलेल्या लोकांसाठी टूथसी देखील एक विश्वासार्ह ब्रँड असल्याचे सिद्ध झाले आहे आणि प्रत्येकासाठी परवडणारे स्माईल मेकओव्हर सक्षम करण्याच्या त्यांच्या अद्भुत मिशनमध्ये व ब्रँड सोबत सामील होऊन त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे.”
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली च्या ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून ऑनबोर्डिंगसह, कंपनीने मेकओ लाँच करण्यासाठी टूथसी आणि स्किनसी ब्रँड्सचे विलीनीकरण (एकत्रीकरण) देखील जाहीर केले आहे, ही भारतात अशा प्रकारची पहिली स्माईल आणि स्किन मेकओव्हर सेवा आहे. मेक ओ आपल्या ग्राहकांना तंत्रज्ञान आणि विज्ञान-समर्थित दात आणि त्वचा निगा समाधाने प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करेल. डिस्पोजेबल इनकम, स्वत: ची काळजी आणि शारीरिक सौंदर्याविषयी जागरूकता असलेल्या ग्राहकांच्या वाढत्या गरजांकडे लक्ष देईल.
मेक -ओ बद्दल:
मेक – ओ ही एक कंपनी आहे जी दात आणि त्वचेसाठी विविध प्रकारचे घरगुती क्लिनिकल ब्युटी सोल्यूशन्स देते. त्याच्या सध्याच्या पोर्टफोलिओमध्ये टूथसी आणि स्किन्सी, दोन नाविन्यपूर्ण सौंदर्यप्रसाधन ब्रँड समाविष्ट आहेत जे भविष्यात सादर केल्या जाणाऱ्या इतर अनेक वर्टिकलपैकी पहिले आहे.
टूथसी आणि स्किनसीची स्थापना ऑर्थोडॉन्टिस्ट-उद्योजक डॉ अर्पी मेहता शाह, डॉ प्रवीण शेट्टी, डॉ मंजुल जैन आणि डॉ अनिरुद्ध काळे यांनी केली होती. टूथसी ने १५०,००० हून अधिक स्माईल प्लॅन्स डिझाइन केले आहेत आणि ग्राहकांना अलाइनर अॅक्सेसरीजची विस्तृत श्रेणी तसेच इलेक्ट्रिक अल्ट्रासोनिक टूथब्रश, दात पांढरे करणारे UV किट यासह बहुमुखी दंत उत्पादने ऑफर करतात. तर स्किनसी लेझर हेअर रिमूव्हल, डर्मा फेशियल आणि अँटी-एजिंग ट्रीटमेंट्ससह घरच्या घरी सर्वोत्कृष्ट त्वचा मेकओव्हर सेवा देते. स्किनसी अॅट-होम लेझर केस काढण्याचे तंत्रज्ञान देशातील सर्वोत्कृष्ट आहे.