जुने सोने सोयीस्कररित्या विकण्याची सुविधा
मुंबईतील झवेरी बाजारातील पहिले टच पॉइंट दुकान
कमीतकमी कमिशन
विश्वासनिय व्यवहार
मुंबई: – ऑगमोण्ट गोल्ड फॉर ऑल हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा गोल्ड प्लॅटफॉर्म लक्षावधी ग्राहकांचा विश्वास असलेला सर्वांसाठी सिंगल-स्टॉप डेस्टिनेशन आहे. भारतातील सोन्याशी निगडित सर्व नवोन्मेषांच्या अग्रभागी असलेल्या या ब्रॅण्डने ग्राहकांच्या जवळ जाण्याच्या उद्दिष्टाने आणखी एक पाऊल टाकले आहे. ऑगमोण्ट गोल्ड फॉर ऑल जुने सोने विकण्याच्या व्यवसायात प्रवेश करण्यासाठी सज्ज असून, याद्वारे जुने सोने विकण्याशी निगडित सर्व मदत पुरवली जाणार आहे तसेच ही प्रक्रियाही सुलभ केली जाणार आहे.
ग्राहकासाठी लाभदायी ठरेल अशा रितीने पूर्णपणे पारदर्शक व डिजिटल प्रक्रियेद्वारे सेवेस प्रोत्साहन देणारा हा पहिलाच कॉर्पोरेट ब्रॅण्ड आहे. भारतात एण्ड-यूजरला त्याचे सोने विकण्यासाठी पारदर्शक यंत्रणा उपलब्ध नाही. ग्राहक साधारणपणे ज्या दुकानातून सोने खरेदी केले असते, त्याच दुकानात ते विकतात. ग्राहकांच्या दृष्टीने याहून मोठे आव्हान म्हणजे त्यांना अनेकदा अनोळखी दुकानांमध्येही आपले सोने विकावे लागते आणि या दुकानांमध्ये त्यांच्या सोन्याच्या शुद्धतेला बहुतेकदा मान्यता मिळत नाही. विशेषत: असंघटित व्यवसायांमध्ये आढळणाऱ्या या अपारदर्शकतेमुळे ग्राहकांना मिळणाऱ्या बाय-बॅक मूल्यात घट होते. म्हणूनच, ग्राहकांना त्यांच्या सोन्याचे सर्वोत्तम मूल्य मिळण्यात मदत करणारी माहिती त्यांना देणे महत्त्वाचे आहे.
जुने सोने विकण्याच्या प्रक्रियेतील ऑगमोण्टचा पहिला टच पॉइंट झवेरी बझारमधील दुकानात सुरू केला जाईल आणि आगामी काही महिन्यांत या सेवेचा विस्तार केला जाईल. आपल्या सेल ओल्ड गोल्ड सेवेमार्फत ग्राहकांना सर्वोत्तम दर व पारदर्शक प्रक्रिया देऊ करण्याचे उद्दिष्ट ब्रॅण्डपुढे आहे, जेणेकरून ग्राहक ब्रॅण्डच्या सेवांवर कायम विश्वास टाकतील. डिजिटल आणि स्वयंचलित सेवांचा उपयोग केल्यामुळे या प्रक्रियेतील वेळ बराच वाचतो. ब्रॅण्ड कोणत्याही ग्राहकाला आपत्कालीन परिस्थितीत सोने विकण्यासाठी येण्याची किंवा जुने सोने देऊन नवीन सोने खरेदी करण्याची मुभा देतो.
सेल ओल्ड गोल्ड योजनेखाली ब्रॅण्ड सोन्याची मोफत परीक्षा करून देतो, सोने वितळवण्याची प्रक्रिया पूर्ण पारदर्शक रितीने केली जाते आणि डिजिटल व्यवहार प्रक्रियेमार्फत सोन्याचे सर्वोत्तम पद्धतीने मूल्यमापन केले जाते. तीन टप्प्यांचे शुद्धता मूल्यांकन ग्राहकाच्या प्राधान्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते, यात कसोटीचा दगड, एक्सआरएफ शास्त्रशुद्ध सोन्याची शुद्धता तपासणारे यंत्र व सोने वितळवण्याच्या प्रगत यंत्राचा समावेश होतो. या यंत्राद्वारे सोने झटपट व सुलभ रितीने वितळते. याशिवाय, सोन्याचे मूल्यांकन शुद्धता, वजन व वर्तमान बाजारदर यांवर केले जाते.
ऑगमोण्ट गोल्ड फॉर ऑलचे संचालक केतन कोठारी सांगतात, “सेल ओल्ड गोल्ड उपक्रमामार्फत ऑगमोण्ट गोल्ड बायींग शाखांमधील ग्राहकांच्या लक्ष्यगटामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे लक्ष्य ऑगमोण्ट गोल्ड फॉर ऑलपुढे आहे. तसेच ऑगमोण्टच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन उत्पादनांबद्दल पूर्वीपासूनच्या व नवीन ग्राहकांना माहिती देण्याचीही ब्रॅण्डला इच्छा आहे. जुने सोने विकण्याच्या व्यवसायात प्रवेश करून, सोने विक्रीची गरज भासते तेव्हा ग्राहकांना सुलभ सेवा पुरवण्याचे उद्दिष्टही आमच्यापुढे आहे.”
*ऑगमोण्ट विषयी*
ऑगमोण्ट गोल्ड फॉर ऑल हा भारतातील आघाडीचा अत्याधुनिक सोने व चांदी शुद्धीकरण व्यवसाय आहे. ही कंपनी स्पॉट (स्पॉट प्रेशियस-मेटल्स ऑनलाइन ट्रेडिंग) हा प्लॅटफॉर्मही भारतभरात चालवते. भारतातील हजारो सराफ त्यांना लागणारे सोने व चांदी स्पॉप प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी करतात. यात १०० ग्रॅम सोन्याची प्रत्यक्ष डिलिव्हरी दिली जाते, तर सोन्याचे १ किलो व ५ किलोचे आणि चांदीचे ३० किलोचे बार्स असतात.
● संघटित सराफ समुदायामध्ये खोलवर संपर्क असलेल्या भारतातील सर्वांत नामांकित शुद्धीकरण व बुलियन कंपन्या
● सर्वांत कार्यक्षम व प्रभावी दर संशोधनांचे वित्तीयदृष्ट्या संरक्षण करण्याची क्षमता
● सर्व शेअर बाजार, ईटीएफ व अन्य मार्गांवर प्रत्यक्ष डिलिव्हरी
● भारतभरात ०.१ ग्रॅमपासून ते १ किलोच्या बार्सपर्यंत बुलियन वितरणाची क्षमता
● सरकारी धोरणांमधील बदलांप्रती अधिक लवचिकता व समायोजनशीलता
● आंतरराष्ट्रीय शुद्धीकरण कारखान्यांच्या तुलनेत कमी खर्चात, पण त्यांच्याहून अधिक चांगल्या नसल्या तरी त्यांच्याच स्तरावरील कार्यक्षमतेने कामकाज
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
Website* https://www.augmont.com/