प्रस्ताव 29 सप्टेंबर 2022 रोजी खुला होणार आणि 3 ऑक्टोबर 2022 रोजी बंद
नवी दिल्ली, सप्टेंबर, 2022: स्वस्तिक पाईप लिमिटेड, हा विशेष पाईप निर्मातादार असून एनएसई इमर्ज मंचावर बुक बिल्डिंग माध्यमातून आगामी सार्वजनिक प्रस्ताव (पब्लिक इश्यू) करिता किंमत पट्टा प्रती समभाग रू. 97-100 याप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. या प्रस्तावात बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्येकी रू. 10 दर्शनी मूल्याचे 62.52 लाख फूल्ली पेड-अप इक्विटी समभाग समाविष्ट असतील. हा प्रस्ताव बोलीकरिता 29 सप्टेंबर, 2022 (गुरुवार) रोजी खुला होत असून 03 ऑक्टोबर 2022 (सोमवार) रोजी बंद होईल. या प्रस्तावाच्या 50 टक्के भाग रिटेल गुंतवणुकदारासाठी आरक्षित असेल.
संदीप बन्सल, अनुपमा बन्सल, शाश्वत बन्सल तसेच गीता देवी अगरवाल प्रवर्तक असलेले स्वस्तिक पाईप्स 1973 पासून माइल्ड स्टील तसेच कार्बन स्टील इलेक्ट्रिक-रेजिस्टंट-वेल्डेड (ईआरडब्ल्यू) ब्लॅक, गॅलव्हनाईज्ड पाईप आणि टयूबचे निर्माते आणि निर्यातदार आहेत.
त्यांचे हरियाणा व उत्तर प्रदेशात दोन निर्मिती प्रकल्प असून त्यांची मासिक 20,000 MT निर्मितीची क्षमता आहे. त्यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या माऊंटिंग रचना, स्टील टयूब्यूलर पोल, ग्रामीण विद्युतीकरणाचे जीआय स्ट्रक्चर इत्यादी असा उत्पादन विस्तार केला आहे. या सार्वजनिक प्रस्तावातून मिळणाऱ्या रकमेचा वापर कंपनीकडून खेळत्या भांडवलाच्या गरजांकरिता होणार आहे.
संदीप बन्सल, अनुपमा बन्सल, शाश्वत बन्सल तसेच गीता देवी अगरवाल हे स्वस्तिक पाईप्सचे प्रवर्तक आहेत. ही कंपनी 1973 पासून टी. टी. स्वस्तिक बॅन्ड हाय क्वालिटी माईल्ड स्टील/ कार्बन स्टील ईआरडब्ल्यू ब्लॅक व गॅलव्हनाईज्ड पाईप/ टयूबचे अग्रगण्य निर्माते आणि निर्यातक आहे. त्यांचे हरियाणा व उत्तर प्रदेशात दोन निर्मिती प्रकल्प असून त्यांची मासिक 20,000 MT निर्मितीची क्षमता आहे. मागील काही वर्षांपासून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या माऊंटिंग रचना, स्टील टयूब्यूलर पोल, ग्रामीण विद्युतीकरणाचे जीआय स्ट्रक्चर इत्यादी असा उत्पादन विस्तार केला आहे.
त्यांच्या मुख्य ग्राहकांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, भेल, कोल इंडिया, डीएमआरसी, ईआयएल, हिंदुस्तान झिंक, एलअँडटी, नालको, एनटीपीसी, एबीबी लिमिटेड इत्यादी मुख्य ग्राहक आहेत. त्यांचे विविध ग्राहक अमेरिका, ब्रिटन, यूएई, ऑस्ट्रेलिया, कतार, जर्मनी, बेल्जियम, मॉरिशस, इथिओपिया तसेच कुवेत अशा अनेक देशांत विस्तारलेले आहेत.
मार्च 2022 मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी कंपनीने रू. 612.19 कोटींच्या उलाढालीची नोंद केली आहे. ईबीआयटीए रू. 29.28 कोटी त्याचप्रमाणे निव्वळ नफा रू. 20.41 कोटींचा आहे.
अस्वीकृती: अमेरिका, कॅनडा, जपान, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना किंवा जिथे प्रस्ताव अथवा विक्री बेकायदेशीर ठरेल अशा इतर कोणत्याही न्यायालयीन कक्षेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, प्रकाशन, वितरण किंवा प्रकाशनाला मज्जाव.