एनजीओ संगतच्या सहयोगाने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी ०११-४११९८६६६ ही टोल-फ्री हेल्पलाइन आणि TheMindclan.com उपलब्ध करून देणार
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने देऊ केला #RaiseYourHand मोहिमेला पाठिंबा
मुंबई, भारत, सप्टेंबर २०२२– मानसिक आरोग्यासाठीची मदत सर्वांना उपलब्ध व्हावी हे लक्ष्य समोर ठेवत मेबिलिन न्यूयॉर्क (MNY) ने ‘ब्रेव्ह टूगेदर’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्यांच्या बाबतीत मित्रमंडळी वा कुटुंबियांकडून मिळणा-या शरमेच्या भावनेला न घाबरता अशा समस्यांसाठी मदत घ्यायला हवी असे भारतातील १५-२४ वयोगटातील केवळ ४१ टक्के युवाप्रौढ व्यक्तींना वाटते. मनोविकारांशी जोडलेला हा सामाजिक कलंक दूर करण्यासाठी आणि त्यासाठीची मदत सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी MNY ने संगत या ना-नफा तत्वावर चालणा-या संस्थेशी सहयोग साधला आहे. या सहयोगाच्या माध्यमातून ०११-४११९८६६६ हा टोल-फ्री क्रमांक तसेच TheMindClan.com या संकेतस्थळाद्वारे तज्ज्ञांचे सहाय्य पुरविले जाणार आहे.
ऑलिम्पिकपटू पीव्ही सिंधू हिचा सहभाग असलेल्या #RaiseYourHand या मोहिमेच्या साथीने या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. या मोहिमेद्वारे ती मानसिक आरोग्याला चर्चेच्या केंद्रस्थानी आणणार आहे व युवकांना मानसिक आरोग्याविषयी बोलते करत त्यांना मानसिक समस्यांसाठी मदत मागण्यास प्रोत्साहित करणार आहे.
“आपण एका स्पर्धात्मक जगामध्ये जगत आहोत, जिथे परिपूर्णता मिळविण्यासाठीची धावाधाव अखंड सुरू असते. आयुष्यामध्ये ध्येय आणि महत्त्वाकांक्षा असणे ही चांगलीच गोष्ट आहे पण त्याचबरोबर आपल्या मानसिक आरोग्याला व त्याचबरोबर फिटनेसला प्राधान्य देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्याविषयीच्या चर्चेशी जोडलेली सामाजिक लांच्छनाची भावना दूर करण्यासाठी आणि मानसिक समस्यांसाठीचा आधार सर्वांना उपलब्ध व्हावा यासाठी मेबिलिन न्यूयॉर्कच्या ब्रेव्ह टूगेदर मोहिमेशी सहयोग साधत असल्याचा मला आनंद आहे.” ती म्हणाली.
एनजीओ संगतच्या साथीने सुरू करण्यात आलेला ०११-४११९८६६६ हा टोलफ्री क्रमांक एकास एक या पद्धतीने वैयक्तिक समुपदेशन आणि तज्ज्ञांची मदत पुरवेल. सार्वजनिक सुट्ट्यांसह प्रत्येक दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत इंग्रजी, हिंदी, मराठी आणि कोंकणी या भाषांतून ही सेवा पुरविली जाईल. TheMindClan.com च्या सहयोगाने इन्क्लुसिव्ह थेरपिस्ट्स, हेल्पलाइन्स, आधार गट, या विषयाशी संबंधित लेख आणि इतर संसाधनांची खास तयार केलेली यादी सर्वांना उपलब्ध करून दिली जाईल.
ब्रेव्ह टूगेदर मोहिमेच्या उद्घाटनाबद्ल बोलताना मेबिलिन न्यूयॉर्क, लॉरिअल इंडियाच्या ब्रॅण्ड जनरल मॅनेजर झीनिया बस्तानी म्हणाल्या, “मानसिक आरोग्याविषयी केवळ जागरुक असणे पुरेसे नाही तर त्यावर कृती करणेही महत्त्वाचे आहे. मेबिलिन ब्रेव्ह टूगेदरच्या मध्यमातून एकास-एक पद्धतीने मदत पुरविण्याप्रती आणि तरुणांमधील मानसिक आरोग्याशी निगडित प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी त्यांना विनामूल्य मदत उपलब्ध करण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत. जगाची आव्हाने पेलण्यासाठी आपण सक्षम आहोत ही भावना जगातील प्रत्येक युवाप्रौढ व्यक्तीच्या मनात रुजावी यासाठी त्यांना सक्षम बनविण्याची आमची इच्छा आहे.”
या मोहिमेला पाठबळ देताना संगतचे सह-संस्थापक आणि मॅनेजिंग कमिटीचे सदस्य विक्रम पटेल म्हणाले, “मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांकडे सर्वसामान्य समस्यांप्रमाणे पाहिले जावे यासाठी तसेच या समस्या दूर करण्याच्या दृष्टीने कृती करण्यासाठी मेबिलिन न्यूयॉर्क ब्रेव्ह टूगेदर मोहिमेशी सहयोग साधत असल्याला आम्हाला अभिमान आहे. WHO ने अलीकडेच जागतिक मानसिक स्वास्थ्य अहवाल प्रसिद्ध केला. आपल्या समाजाकडून मानसिक आरोग्यासाठीच्या मदत यंत्रणांना मिळणा-या प्रतिसादामध्ये तातडीने बदल होण्याची गरज या अहवालामध्ये मांडण्यात आली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही मनोविकारांचा सामना करणा-या व्यक्तींना लोकांकडून मिळणा-या अन्याय्य वागणुकीला दूर करू शकू आणि समुदायावर आधारित मदत अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देऊ शकू, अशी आम्हाला आशा आहे.”
TheMindClan.com चे सह-संस्थापक आणि प्रोडक्ट लीड मणी कुमार म्हणाले, “मेबिलिन ब्रेव्ह टूगेदर ही मोहिमेचे काम केवळ मानसिग आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यापुरते मर्यादित नाही तर मानसिक आरोग्याच्या देखभालीस मदत करणारी संसाधने उपलब्ध करून देत आधाराचे हे वर्तुळ पूर्ण करण्याविषयी जाणीवपूर्वक हाती घेतलेले काम आहे. या सहयोगाच्या माध्यमातून मनोस्वास्थ्यासाठी आधार मिळविण्याच्या भारतीयांच्या प्रवासामध्ये त्यांचे वाटाडे बनण्याचे काम अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक करू शकू, अशी आम्हाला आशा आहे.”
या मोहिमेच्या उद्घाटनाला ३६०-डिग्री एकात्मिक मार्केटिंग कम्युनिकेशन मोहिमेचे पाठबळ पुरविले जाईल, ज्यात डिजिटल, आऊटडोअर आणि इन्फ्लुएन्सर्सशी संवाद अशा सर्व माध्यमांतील प्रसिद्धीचा समावेश असेल.
फिल्म आणि इतर असेट्ससाठी लिंक – https://youtu.be/73PzNZMj8IE