मुंबई, सप्टेंबर २०२२: अपग्रॅड या आशियातील सर्वांत मोठ्या एडटेक कंपनीने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार करत, यावर्षी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, आपल्याविद्यार्थ्यांपैकी ४५०हून अधिक जणांनी एमबीए डोमेनमध्ये करिअर ट्रान्झिशन केल्याची नोंद केली आहे.
या स्थलांतरामध्ये (ट्रांझिशन्स) विद्यार्थ्यांनी ३२८ टक्के एवढी सर्वोच्च सीटीसी वाढ प्राप्त केली. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या वाढीच्या तुलनेत ही वाढ ६६ टक्के अधिक आहे.
“आमच्या करिअर निष्पत्ती प्रत्येक तिमाहीगणिक अधिक बळकट होत आहेत आणि या ऑनलाइन प्रतिभेला केवळ भारतातीलच नव्हे, तर परदेशातील रिक्रुटर्सकडून अधिक चांगली स्वीकृती मिळू लागली आहे,” असे अपग्रॅड रेक्रुटचे व्यवस्थापकीय संस्थापक अजय शहा यांनी सांगितले.
मागील वर्षाच्या तुलनेत ६८० टक्क्यांहून अधिक वाढ साध्य केल्यामुळे, पहिल्या तिमाहीत एमबीए डोमेनमध्ये करिअर स्थित्यंतर करणाऱ्या सर्वांत मोठ्या बॅचला रिलायन्स, जिओ, डिस्नेस्टारइंडिया, इन्फोसिस, मॉन्स्टर, एचडीएफसीएएमसी, क्लीअरटॅक्स, फ्लिपकार्ट, एड्युवांझ, एक्स्पेडिफाय, इन्फोकॉम लिमिटेड, झोलो स्टेज आणि डिल्हिवरी अशा ७५हून अधिक कंपन्यांमध्ये प्लेसमेंट्स मिळाली आहेत.
“तंत्रज्ञानामुळे बाजारपेठेतील बदलाला वेग आला आहे आणि त्यामुळे व्यावसायिकांना ५ वर्षांपूर्वी कदाचित आवश्यक नव्हती अशी कौशल्ये संपादन करण्याची गरज निर्माण झाली आहे. नवीन युगातील आव्हाने सातत्याने ओळखून उमेदवारांना अचूक व वेळेसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देणाऱ्या अपग्रॅडसारख्या नवीन युगातील एडटेक कंपन्या म्हणूनच उपयुक्त आहेत. बदलाशी तातडीने जुळवून घेऊ शकेल आणि कार्यक्षम परिणामांना चालना देण्याच्या दृष्टीने स्वत:ची कौशल्ये अद्ययावत करू शकेल असे चपळ मनुष्यबळ हवे असे मला एक एम्प्लॉयर म्हणून वाटते,” असे टीए रिलायन्सजिओच्या उपव्यवस्थापक जसलीन कौर म्हणाल्या.
नियुक्त्या एचआर, बिझनेस मॅनेजमेंट, अॅनालिटिक्स आणि वित्त विभागातील पदांसाठी केल्या जातात. भारतात २०२६ पर्यंत तांत्रिक व्यावसायिकांची कमतरता १४-१९ लाख एवढ्या संख्येने जाणवेल, असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील मनुष्यबळात दरवर्षी रुजू होणाऱ्या १३ दशलक्ष लोकांमधील व्यवस्थापन व्यावसायिकांचा विचार करता चारपैकी केवळ एक उमेदवार नियुक्त होण्याजोगा असतो. उद्योगक्षेत्राच्या दृष्टीने तयार केलेल्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ही वाढती तफावत दूर केली जाऊ शकते. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना समर्पित प्रकल्प, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, उद्योगक्षेत्रातील मेंटॉरिंग आणि करिअर सेशन्स यांच्या माध्यमातून त्यांच्या व्यावसायिक क्षमता वाढवण्यात मदत मिळू शकते. व्यवसायात इच्छित परिणाम प्राप्त करण्यासाठी नवनवीन तर्क लढवून बघण्यातही त्यांना हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील.
अपग्रॅडकडे एमबीए पोर्टफोलिओतील १०हून अधिक उत्तम ऑनलाइन अभ्यासक्रम आहेत आणि यांसाठी आघाडीच्या भारतीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी कंपनीने सहयोग केलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एआय/एमएलवर आधारित अध्ययन उपलब्ध करून दिले जात आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये अद्याप या नवीन तंत्रज्ञानांचा समावेश झालेला नाही.
“यामध्ये केवळ विद्यापीठांशी सहयोग करण्याचा उद्देश नाही, विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठांच्या साथीने एक अर्थपूर्ण अध्ययन अनुभव निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. यात विद्यार्थ्यांचा आमच्यासोबतचा दीर्घकालीन प्रवास अधिक चांगला व्हावा या दृष्टीने आम्ही लाइव्ह किंवा रेकॉर्डेड लेक्चर्स, रिअल टाइम चर्चामंच, प्रॉक्टर्ड परीक्षा, उद्योगक्षेत्राशी संबंधित प्रकल्प, मास्टरक्लासेस, बूटकॅम्प्स आणि कॅपस्टोन प्रकल्प यांसारख्या फॉरमॅट्सकडे गांभीर्याने लक्ष देतो,” असे शहा यांनी अखेरीस सांगितले.