भारताच्या रग्बी 7s महिलांच्या व मुलींच्या आणि रग्बी 7s पुरुषांच्या व मुलांच्या टीमचे सहप्रायोजक म्हणून कॅपजेमिनी या क्रीडाप्रकाराच्या भारतभरातील विकासासाठी सहकार्य करेल
मुंबई, 14 सप्टेंबर 2022 : कॅपजेमिनीने आज इंडियन रग्बी फुटबॉल युनियनशी (आयआरएफयू) भागीदारी केल्याची घोषणा केली. या माध्यमातून ते भारताच्या रग्बी 7s संघांना सहकार्य करणार आहेत. कॅपजेमिनी हे वर्ल्ड रग्बीचे जागतिक स्तरावरील औपचारिक भागीदार आणि जागतिक पातळीवरील या खेळाचे प्रमुख समर्थक आहेत. या घोषणेच्या माध्यमातून कॅपजेमिनीचा रग्बी प्रवास आणि खेळाच्या माध्यमातून वैविध्यता व सर्वसमावेशकतेच्या अजेंड्याचा प्रसार करण्यासाठी कॅपजेमिनीने अजून एक पाऊल टाकले आहे. कॅपजेमिनीचा भारतातील हा पहिलाच प्रयत्न आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, या क्रीडाप्रकाराचा भारतात प्रसार करण्याच्या व वाढविण्याच्या आरआयएफयूच्या उद्दिष्टाला सहकार्य करण्यात कॅपजेमिनी सक्रिय भूमिका निभावेल.
या भागीदारीबद्दल प्रतिक्रिया देताना भारतातील कॅपजेमिनीच्या सीईओ अश्विनी यार्दी म्हणाल्या, “कॅपजेमिनीमध्ये वैविध्यता व सर्वसमावेशकतेची तत्वे ही आमच्यासाठी कल्पकता, नवोपक्रम आणि प्रेरणेचा स्रोत आहेत. आमच्या निर्धाराला बळकटी देण्यासाठी रग्बी 7s साठी आयआरएफयूशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. कारण या निमित्ताने रग्बीसोबत असलेल्या आमच्या सहयोगाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे आणि भारतातील क्रीडाक्षेत्रात आमचे पदार्पण होत आहे. कॅपजेमिनीमध्ये आम्ही पीपल बिझनेसमध्ये (ग्राहकांशी असलेले संबंध व त्यांचे समाधान हा महत्त्वाचा पैलू असणारा व्यवसाय) आहोत आणि या सहयोगातून टीम स्पिरीट व खिलाडूपणा आणि सर्वसमावेशक कार्यस्थळे निर्माण करण्याचा आमचा निर्धार दिसून येतो.”
रग्बी इंडियाचे अध्यक्ष राहुल बोस म्हणाले, “रग्बी या क्रीडाप्रकाराचा भारतात प्रसार होण्याची कथा ही वैविध्यता व सर्वसमावेशकतेची कथा आहे. आजच्या घडीला आमचा महिला कार्यक्रम हा पुरुषांच्या तोडीस तोड आहे आणि देशातील विविध भागांमधील आदिवासी तरुणांपर्यंत असलेला आमचा संपर्क हा बिगर-आदिवासी भागांमधील संपर्काइतकाच खोलवर रुजलेला आहे. वंचित सामाजिक स्तरापर्यंत हा क्रीडाप्रकार पोहचविण्यासाठी असलेला आमचा निर्धार हा अनुकूल परिस्थिती राहणाऱ्यांपर्यंत हा क्रीडाप्रकार पोहोचविण्याइतकाच धारदार आहे. म्हणूनच विविधता व सर्वसमावेशकता ही तत्वे अंगीकारलेल्या कॅपजेमिनीसोबतची भागीदारी हा आमचा साहजिक निर्णय होता. त्यांची मूल्ये आमची मूल्ये प्रतिबिंबीत करतात. त्यांचा विश्वास व सहकार्यानेच रग्बी इंडियाने ही मूल्ये अधिक खोलवर रुजविण्याचा निर्धार केला आहे. आणि त्यांच्या विश्वासाने आणि पाठिंब्यानेच रग्बी इंडिया आपल्या उत्कृष्टतेच्या मार्गावर आणि देशाला सन्मान प्राप्त करून देण्याच्या मार्गावर या मूल्यांप्रती अधिक वचनबद्धतेचा निर्धार व्यक्त करते.
कॅपजेमिनीच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर व डायव्हर्सिटीच्या चेअरपर्सन सारिका नाईक म्हणाल्या, “खेळांमुळे सामायिक अनुभवांच्या माध्यमातून लोक एकत्र येतात आणि तरुण प्रेक्षकांमध्ये सुसंसावद घडवतात. भारतातील बहुतेक अॅथलिट्स श्रेणी 2 किंवा 3 शहरांमधून येतात. या सहयोगाच्या माध्यमातून आम्हाला या खेळाला चालना द्यायची आहे आणि या क्रीडाप्रकाराला मुख्य प्रवाहात आणायचे आहे. जास्तीत जास्त लोकांनी खेळ खेळावे आणि त्यांना हव्या असलेल्या भविष्यासाठी त्यांना पुढील मार्ग उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. सर्व लिंगांच्या व पार्श्वभूमी असलेल्या मुलांना रग्बी हा क्रीडाप्रकार खेळता यावा व उपलब्ध व्हावा हे रग्बी इंडियाच्या गेट इनटू रग्बी प्रोग्रॅमचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम कॅपजेमिनीचा गाभा व वैविध्यता व सर्वसमावेशकता या मूळ तत्वांशी सुसंगत आहे.”
कॅपजेमिनीच्या रग्बीशी असलेल्या सहयोगाला मोठा इतिहास आहे आणि रग्बी प्रायोजकत्वाचा वारसा आहे. या ग्रुपचे दिवंगत संस्थापक सर्गे काम्फ हे स्वतः रग्बीचे चाहते व खेळाडू होते. त्यांच्यापासूनच या खेळाशी या ग्रुपचा असलेला सहयोग सुरू आहे. आजच्या घडीला दोन्ही वर्ल्ड रग्बी आणि पुरुषांची (रग्बी वर्ल्ड 2023) आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा (रग्बी वर्ल्ड कप 2021, ज्या ऑक्टोबर 2022 मध्ये खेळवल्या जातील व रग्बी वर्ल्ड कप 2025) तसेच एचएसबीसी वर्ल्ड रग्बी सेव्हन सीरिजची कॅपजेमिनी ही एकमेव प्रायोजक आहे. वर्ल्ड रग्बीचे ग्लोबल डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर म्हणून कॅपजेमिनी चाहत्यांसाठी व प्रशिक्षकांसाठी डिजिटल अनुभव अधिक चांगला करण्यासाठी कॅपजेमिनी फेडरेशनसोबत काम करत आहे. यासाठी ते डेटा विश्लेषण, कृत्रिम प्रज्ञा (एआय) व क्लाउड क्षमतांचा वापर करत आहे. हा ग्रुप, विमेन इन रग्बी प्रोग्रॅमचासुद्धा जागतिक पातळीवरील भागीदार आहे. महिलांचा खेळ व या खेळातील महिलांचे नेतृत्व यांच्या विकासाचा वेग वाढविण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतात.
कॅपजेमिनी ही जागतिक कंपनी असून ती 50 देशांमध्ये आहे. ती इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, आयर्लंड, फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, जपान व ऑस्ट्रेलिया तसेच आगामी रग्बी विश्वचषक 2021 आयोजित करणाऱ्या न्यूझीलंडमध्ये अस्तित्वात आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जगातील आघाडीच्या रग्बी टीम आमनेसामने येणार आहेत. हा ग्रुप भारतातही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असून पुरुष व महिलांमध्ये या खेळाचा प्रसार करण्यासाठी आपल्या सर्व आंतरराष्ट्रीय कार्यस्थळांवर हा ग्रुप प्रयत्नशील असेल.