वर्षी आपल्या लाडक्या देव गणेशाचे स्वागत करणारा : “श्री गणेशा” हा नवीन मधुर संगीत व्हिडिओ पहा….
सप्टेंबर,२०२२ : गणपती बाप्पाचे आगमन झाले असून सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. आपण सर्वजण चैतन्यमय वातावरणाने वेढलेले आहोत.त्यातच आता बाप्पाच्या स्वागतासाठी ”श्रीगणेशा देवा श्रीगणेशा…” हे आल्हाददायी गाणं. आदर्श शिंदे यांच्या जल्लोषमय आवाजातील या गाण्याला ओंकार घाडी यांचे शब्द लाभले असून काशी रिचर्ड यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. या गणेशोत्सवात सर्वांना गायला आणि नाचायला लावणारे हे गाणे या लिंकवर क्लिक करून बघता आणि ऐकता येईल : https://www.youtube.com/watch?v=mwlVAL1X2gA
ढोल ताशांचा गजर … गुलालाची उधळण.. बाप्पाचा जयघोष… असे गणेशोत्सवातील भारावून जाणारे वातावरण या गाण्यात पाहायला मिळत आहे. बाप्पाविषयीची भाविकांची आत्मीयता या भावपूर्ण गाण्यातून व्यक्त होत आहे. या गाण्याबद्दल गायक आदर्श शिंदे म्हणतात, ”मुळात बाप्पाचे गाणं गायला मला नेहमीच आवडते. भक्तिमय गाणी गाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. ”श्रीगणेशा देवा श्रीगणेशा…” हे गाणेही असेच स्फूर्तिदायी गाणे आहे. हे गाणे भाविकांनाही आवडेल, अशी मी आशा व्यक्त करतो.”.
त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव ”श्रीगणेशा देवा श्रीगणेशा…”ने सर्वत्र जल्लोषात आणि थाटात साजरा होणार आहे. हे गाणे तुमच्यासाठी घेऊन आले आहे ”अल्ट्रा मीडिया ॲण्ड एन्टरटेन्मेंट प्रा. लि.” .या गाण्याची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली आहे..