स लमान खानने शुुक्रवारी चित्रपटसृष्टीत आपल्या पदार्पणाची ३४ वर्षे पूर्ण केली. यानिमित्त त्याच्या चाहत्यांनी #34YearsOfSalmanKhanEra ट्रेंड करून सेलिब्रेट केले. सलमानने आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि नेहमीच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. यासोबतच त्याने आपल्या आगामी प्रकल्पाचे अंतिम नाव शेअर केले. आता त्याच्या चित्रपटाचे नाव ‘किसी का भाई… किसी की जान’ असे असेल. हे नाव ‘भाईजान’ असे होते. सुरुवातीला हे नाव ‘कभी ईद कभी दिवाली’ असेही होते. या चित्रपटाच्या नावात दुसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. सलमानने या चित्रपटाचा लूकही कन्फर्म केला, जो मागील काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
सलमानला तरुण दिग्दर्शकासोबत काम करायचे आहे
यानिमित्त या व्यवसायातील जाणकारांनी सलमानच्या पुढील योजना जाहीर केल्या. त्यांनी सांगितले, ‘सलमान यापुढे तरुण दिग्दर्शकांसोत काम करणार आहे. ‘किसी का भाई… किसी की जान’मध्ये सलमानचा डबल रोल असू शकतो. दोन्ही पात्रांची बालपणी ताटातूट होते आणि दोघांचे वेगळ्या धर्मांचे आचरण करणाऱ्या घरांत पालनपोषण होते. कथेच्या सुरुवातीच्या ड्राफ्टनुसार हा चित्रपट वन लाईनर होता. अंतिम कथेत हाच ड्राफ्ट कायम राहतो की त्यात काही बदल झाले आहेत, हे पाहणे रंजक असेल.’
चित्रपटसृष्टीत ३४ वर्षे पूर्ण
मल्टिस्टारर चित्रपटांपासूनही दूर राहणार नाही सलमान
सलमानला हल्ली ‘मल्टि हीरो जोनर’ चित्रपटांचेही पथ्य नाही. ट्रेड जाणाकारांनुसार, ‘तो ‘पठाण’मध्ये शाहरूखसोबत आहे. ‘टायगर 3’मध्ये शाहरूखसोबत त्याचा कॅमिओ आहे. या दोन्ही चित्रपटांत ऋतिक रोशनही आहे. तथापि, याबाबत निर्माते, सलमान आणि ऋतिककडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. मात्र हे नक्की आहे की सलमानप्रमाणे अन्य अभिनेतेही मल्टीहीरो चित्रपट करत आहेत, जेणेकरून चित्रपटगृहांत सर्वांचेच चाहते यावेत. उदाहरण पाहायचे तर अक्षयकुमार अापल्या आगामी चित्रपटांत अर्शद वारसी आणि टायगर श्रॉफसोबत काम करणार आहे. अर्शद त्याच्यासोबत ‘जाॅली एलएलबी 3’ तर टायगरसोबत अक्षय ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’मध्ये दिसणार आहे.
या चित्रपटाशिवाय सलमान दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीसोबत ‘गॉडफादर’ चित्रपट करत आहे. ‘लुसीफर’ या मल्याळी चित्रपटाचा हा रीमेक आहे. ‘लुसीफर’मध्ये मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनी काम केले होते. ‘गॉडफादर’मध्ये त्या भूमिका सलमान आणि चिरंजीवी साकारत आहेत. पृथ्वीराज सुकुमारन याने ‘लुसीफर’मध्ये केलेल्या भूमिकेत येथे सलमान आहे. टीझरमध्ये सलमानच्या अॅक्शनची झलक दिसली आहे. दरम्यान, यानंतर सलमान ‘बजरंगी भाईजान’चा दुसरा भागही करणार आहे. त्याची कथा विजेंद्र प्रसाद लिहित आहेत. सलमान यात दक्षिणेतील दिग्दर्शकासोबत काम करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. यासंबंधीची घोषणाही लवकरच केली जाईल.