मुंबई जेव्हा इन्सुलीनच्या संदर्भात तुमच्या शरीरामध्ये काही समस्या निर्माण होतात तेव्हा मधुमेह-पूर्व (प्री-डायबीटीस) स्थिती सुरु होते. इन्सुलीन हे एक संप्रेरक (हार्मोन) आहे आणि ते ग्लुकोजला तुमच्या पेशींमध्ये जाण्यास आणि त्यांना ऊर्जा पुरविण्यास मदत करते. इन्सुलीनच्या बाबतीत ज्या समस्या उद्भवू शकतात त्या पुढीलप्रमाणे असू शकतात –इन्सुलीन अवरोध ही अशी एक पायरी आहे कि जिथे शरीर इन्सुलीनचा योग्य वापर करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या पेशींना तुमच्या शरीरातून ग्लुकोज मिळविणे कठीण होवून जाते. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. तुमचे शरीर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी आवश्यक इन्सुलीन पर्याप्त प्रमाणात बनवू शकत नाही. संशोधकांचे असे मानणे आहे की, जर तुम्ही लठ्ठ असाल आणि तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर त्यामुळे तुमच्यात मधुमेह-पूर्व स्थिती निर्माण होते. असे -डॉ सुनील एन कांबळे, मधुमेहतज्ज्ञ आणि सर्वसामान्य रोग चिकित्सक, ग्लोबल रुग्णालय, परेल म्हणाले.
मधुमेह-पूर्व स्थितीचे निदान :
मधुमेह-पूर्व स्थितीचे निदान करण्यासाठी विविध रक्त तपासण्या उपलब्ध आहेत. त्यातील काही नेहमीच्या तपासण्या पुढीलप्रमाणे : फास्टींग प्लास्मा ग्लुकोज (एफपीजी) तपासणी. या तपासणीमध्ये एका ठराविक वेळी तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे हे तपासले जाते. हे प्रमाण १०० ते १२५ असणे हा मधुमेह-पूर्व किंवा प्री-डायबिटीस स्थिती आहे. ए1सी तपासणी ही तुमच्या रक्तातील गेल्या तीन महिन्यांचे सरासरी साखर प्रमाण शोधून काढते. जेवढी सरासरी अधिक तेवढी तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक असा त्याचा अर्थ होतो. ५.७ ते ६.४ टक्के हे मधुमेह-पूर्व स्तराचे प्रमाण आहे.
मधुमेह-पूर्व स्तराचा धोका कोणाला सतावू शकतो?
प्रौढांमध्ये एक तृतीयांश लोकांना मधुमेह-पूर्व साखर प्रमाण असते. ही पातळी पुढील लोकांमध्ये सर्वसामान्यपणे आढळून येते :
ज्यांचे वजन अधिक आहे किंवा जे लट्ठ आहेत
ज्यांचे वय ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे
ज्यांच्या घरात पालक, भाऊ किंवा बहिण यांना मधुमेह आहे
जे शारीरिकदृष्ट्या सक्रीय नाहीत
ज्यांना उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टरॉल ची समस्या आहे
ज्यांना गर्भारपणातील मधुमेह होता
पॉलीसीस्टीक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आहे
जर तुम्हाला मधुमेह-पूर्व स्थिती असेल तर तुम्हाला मधुमेह होवू शकतो?
जर तुम्हाला मधुमेह-पूर्व स्थ्तीती असेत तर तुम्ही प्रकार-२चा मधुमेह टाळू शकता किंवा त्याला विलंब करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये पुढील बदल करावे लागतील : जर तुमचे वजन जास्त असेल तर ते कमी करून हे साध्य होते, नियमितपणे शारीरिक व्यायाम करून आरोग्यपूर्ण आणि कमी कॅलरी असलेले जेवण घेवून. ज्यांना उच्च जोखीम असते अशा लोकांनाही मधुमेहाची औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो.
डॉ सुनील एन कांबळे, मधुमेहतज्ज्ञ आणि सर्वसामान्य रोग चिकित्सक, ग्लोबल रुग्णालय, परेल, मुंबई