POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 21/05/2026 📞 9004379946
मुंबई, NHI.COM : बॅडमिंटन गुरुकुल पुरस्कृत तसेच ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) आणि विलिंग्डन एससी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोतीराम, उल्लाल आणि कानजी चषक बॅडमिंटन स्पर्धेत चेंबूर आणि सीसीआय जिमखाना संघाने कानजी चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अंतिम चार संघांमध्ये ठाकूर एससी आणि ऑल इंडिया बाल्कनजी बारी संघांचाही समावेश आहे.
विलिंग्डन एससीवर सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य सीसीआयने ठाकूर एससी आणि यजमान विलिंग्डन एससीवर ३-० असा विजय मिळवत आपले अपराजित राहण्याचे सत्र कायम राखले. त्याचप्रमाणे चेंबूर जिमखान्यानेही अनुक्रमे बाल्कनजी बारी आणि पी. एम. बाथवर ३-१ अशी मात केली. अंतिम फेरीसाठी सीसीआयचा सामना बाल्कनजी बारी तर चेंबूर जिमखान्याचा सामना ठाकूर एससीशी होईल.
बीकेएलपी ‘अ’ आणि बॉम्बे जिमखाना ‘अ’ संघासोबत चेंबूर जिमखाना आणि सीसीआयने पुरुषांसाठीच्या मोतीराम चषकाच्या एलिट गटाच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. फायनलमध्ये सीसीआयचा सामना बॉम्बे जिमखाना तर बीकेएलपीचा सामना चेंबूर जिमखान्याशी होईल.
मोतीराम कप प्लेट गटाच्या उपांत्य फेरीत एनएससीआय ‘अ’ विरुद्ध बीकेएलपी ‘ब’ आणि जुहू जिमखाना विरुद्ध सीसीआय ‘ब’ असे सामने होतील.
निकाल (मोतीराम कप): बीकेएलपी (अ) विजयी वि. सीसीआय (क) – २-०; सीसीआय (अ) विजयी वि. बीकेएलपी (ब) – २-०; बीकेएलपी (अ) वि. जुहू जिमखाना – २-०; सीसीआय (अ) विजयी वि. ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स – २-०; जुहू जिमखाना विजयी वि. सीसीआय (क) – २-१; बीकेएलपी (ब) विजयी वि. ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स – २-०.
कानजी कप – चेंबूर जिमखाना विजयी वि. ऑल इंडिया बाल्कन जी बारी ३-१; सीसीआय विजयी वि. ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ३-०; चेंबूर जिमखाना विजयी वि. पी. एम. बाथ ३-१; सीसीआय विजयी वि. विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब ३-०; ऑल इंडिया बाल्कन जी बारी विजयी वि. पी. एम. बाथ ३-१; ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विजयी वि. विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब ३-०.











