POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 21/05/2026 📞 9004379946
मुंबई NHI.IN
: जागतिक बाजारपेठा वेगाने बदलणाऱ्या आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जात असताना, झी बिझनेस तर्फे २५ मे २०२६ रोजी मुंबईतील आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रल येथे ‘वेल्थ क्रिएशन समिट २०२६’चे आयोजन करण्यात येणार आहे.
या परिषदेत वित्त, बँकिंग, गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रातील देशातील आघाडीचे तज्ज्ञ आणि मान्यवर सहभागी होणार असून, उदयोन्मुख संधी, बाजारपेठेचा दृष्टिकोन आणि दीर्घकालीन शाश्वत संपत्ती निर्मितीच्या रणनीतींवर चर्चा होणार आहे.
गुंतवणूकदार, उद्योजक, उद्योग नेते आणि आर्थिक निर्णय घेणाऱ्यांसाठी प्रभावी व्यासपीठ म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत बाजारातील ट्रेंड्स, गुंतवणूक धोरणे, वैयक्तिक वित्त व्यवस्थापन, पर्यायी गुंतवणूक पर्याय आणि भारतातील संपत्ती निर्मितीच्या बदलत्या स्वरूपावर सखोल चर्चा होणार आहे.
या कार्यक्रमाबाबत बोलताना झी मिडिया कॉर्पोरेशन चे सीईओ रक्तिम दास म्हणाले की , “भारताची आर्थिक व्यवस्था झपाट्याने विकसित होत आहे. वाढती गुंतवणूकदार जागरूकता, डिजिटल माध्यमांचा विस्तार आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याची वाढती प्रवृत्ती यामुळे हा बदल घडत आहे. एक अग्रगण्य न्यूज नेटवर्क म्हणून झी मिडिया कॉर्पोरेशन उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, नेते आणि प्रेक्षकांना एकत्र आणून अर्थपूर्ण विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहे.











