• चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील एकूण उत्पन्न २०.३१ कोटी रुपये, एकूणच ६७.३ टक्के
वार्षिक वाढ
• चालू आर्थिक वर्षातील ईबिटा (EBITDA) २.१७ कोटी, २३११.१ टक्के वार्षिक वाढ
• चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील कालावधीत ईबिटा (EBITDA) मार्जिन १ टक्क्यावरुन
१०.६८ टक्केवर गेला.
मुंबई ८ ऑगस्ट २०२२ – ॲवरो इंडिया लिमिटेड (NSE – AVROIND आणि BSE – 543512), प्लास्टिक
मोल्डेड फर्निचर उत्पादनांच्या आघाडीच्या उत्पादकांपैकी अग्रगण्य कंपनी असून कंपनीने चालू आर्थिक
वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित आर्थिक परिणाम जाहीर केले आहेत.
प्रमुख आर्थिक बाबी एका दृष्टीक्षेपात :
Particulars (Rs crore) | Q4 FY22 | Q4 FY21 | YoY Change |
Total Income | 20.31 | 12.14 | 67.3% |
EBITDA | 2.17 | 0.09 | 2311.1% |
EBITDA Margin | 10.68 | 0.74 | 994 bps |
Net Profit | 1.04 | -0.36 | Loss to Profit |
Net Profit Margin | 5.12 | -2.97 | Loss to Profit |
EPS (Rs.) | 1.03 | -0.36 | Loss to Profit |
कामगिरीबद्दल भाष्य करताना, ॲवरो इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष श्री. सुशील कुमार अग्रवाल म्हणाले
की,
आर्थिक वर्ष २०२२ मधील मजबूत कामगिरीनंतर, आम्ही चालू आर्थिक वर्षात जोरदार वाटचाल सुरू
ठेवली आहे. या कालावधीत सणासुदीचा हंगाम नसल्यामुळे पहिली आणि दुसरी तिमाही साधारणपणे
कमी असली तरी, कंपनीने प्रभावी आकडा नोंदवण्यात यश मिळवले.
या तिमाहीत, आमची ऑनलाइन विक्री अत्यंत चांगली करत असताना आम्ही ऑफलाइन मोडद्वारे
आमची पॅन इंडियाची उपस्थिती वाढवली आहे.
तिमाही आणि आर्थिक वर्ष २०२३ चे मुख्य आकर्षण म्हणजे ग्रीन कंपनी आणि खर्चाचे ऑप्टिमायझेशन
हे आमचा पुढाकार असेल जे पुढे जाणाऱ्या आमच्या प्रयत्नातून दिसून येईल.”