भारतातील ग्रामीण बँकिंग आऊटलेट्सना प्रथमच ‘रेडब्लू रेव्होल्यूशन’च्या माध्यमातून विशेष ओळख मिळणार
● भारतात आर्थिक स्वातंत्र्य आणण्यासाठी भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त रेडब्लू रेव्होल्यूशन आणण्यात आली आहे ● लाल रंग हा समृद्धी आणि ऊर्जेचे तर निळा रंग सुरक्षा व विश्वासाचे प्रतीक आहे.
मुंबई, ४ ऑगस्ट २०२२: यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या ऐतिहासिक निमित्ताने भारतात पहिलीवहिली रेडब्लू रेव्होल्यूशन आली आहे. हा एक असा ब्रँड आहे, ज्याचे ध्येय ग्रामीण बँकिंग आऊटलेट्ससाठी एक विशेष ओळख निर्माण करण्याचे आहे. या आऊटलेट्सना लाल आणि निळ्या रंगांनी रंगवले जाणार आहे. लाल रंग समृद्धी आणि ऊर्जेचे तर निळा रंग विश्वास व सुरक्षेचे प्रतीक असल्यामुळे बँकिंग आणि वित्तीय सेवा उद्योगांसाठी पारंपरिकदृष्ट्या मान्यताप्राप्त रंग आहेत. यामुळे बँकिंग आणि वित्तीय सेवा विभागाला प्रत्येक टच पॉइंटद्वारे या भावनांसोबत सुसंगती आणून ग्राहकांशी संबंध सुधारणे शक्य होईल. या खेरीज ही आऊटलेट्स स्मार्ट बँकिंग पॉइंट्स म्हणूनही ओळखली जात आहेत. त्यामुळे बँकेची प्रत्यक्षातील ओळख सुलभीकृत होऊ शकेल.
स्पाइस मनी (Spice Money) या भारताच्या आघाडीच्या फिनटेक कंपनीने आपल्या व्यापक पायाद्वारे आपल्या स्थानिक विभागात बँकिंग आऊटलेट ओळखू न शकणाऱ्या ग्रामीण नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत कारण त्यांची कधीही एक विशेष ओळख नव्हती, मग ते रंग असो किंवा त्यांची संस्कृती असो. यातील अनेक आऊटलेट्स विविध उत्पादनेही विकत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी एक विशेष स्टोअर ओळखणे किंवा शोधणे कठीण जाते. त्याचा परिणाम म्हणून ते दिसून येत नाहीत आणि लोकांचे येणे कमी असल्यामुळे ग्रामीण नागरिकांनाही अत्यंत मर्यादित साधने मिळतात. स्पाइस मनीने रेड ब्लू रेव्होल्यूशन या आऊटलेट्सना ग्रामीण नागरिकांच्या मनात स्मार्ट बँकिंग पॉइंट्स म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी आणि ग्रामीण नागरिकांना अत्यंत सुलभ पद्धतीने ग्रामीण बँकिंग आऊटलेट सहजपणे दिसावे यासाठी आणले आहे.
कंपनीचे उद्दिष्ट भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत कार्यरत वित्तीय सेवा देणाऱ्या सर्व उद्योगांपर्यंत पोहोचण्याचे आणि त्यांना एकत्र आणून हा प्रयोग देशभरात आणण्यासाठी क्रांती करण्याचे आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) २०२१-२२ च्या वार्षिक अहवालानुसार भारतात ३२, ५७, २५१ ग्रामीण बँकिंग आऊटलेट्स आहेत, जी ग्रामीण लोकसंख्येला विविध प्रकारच्या सेवा जसे रोख भरणा, आधारने जोडलेली पेमेंट यंत्रणा रोख रक्कम काढण्यासाठी, मनी ट्रान्सफर, मिनी एटीएम, विमा, कर्जे, बिल प्रदान, एनबीएफसी/ बँकांचे ग्राहक/ एजंट/ प्रतिनिधी यांच्यासाठी रोख जमा करण्याचे सेंटर, एअरटाइम रिचार्ज, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, ऑनलाइन खरेदी, पॅन कार्ड आणि एमपीओएस सेवा. रेडब्लू रेव्होल्यूशनद्वारे स्पाइस मनी भारतातील बँकिंग आणि डिजिटल सेवा देणाऱ्या प्रत्येक ग्रामीण बँकिंग आऊटलेटला मग त्यांचे ब्रँड/ कंपनी काहीही असो, त्यांच्या दुकानांच्या बाह्य रचना लाल आणि निळ्या रंगवण्याचे आवाहन करत आहेत, जेणेकरून ग्राहकांना स्मार्ट बँकिंग पॉइंट्स ओळखणे शक्य होईल आणि स्थानिक बँकिंग पॉइंट म्हणून सुस्पष्ट आणि विशेष ओळख स्थापित करून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. त्यामुळे ग्रामीण वित्तीय सेवांशी संबंधित व्यवसायांमध्ये स्वारस्य वाढू शकेल.
भारताने आतापर्यंत अनेक मोहिमा आणि चळवळी पाहिल्या आहेत. त्या प्रामुख्याने कृषी क्षेत्राशी संबंधित होत्या आणि त्यांनी उत्पादन क्षमता व दर्जा वाढवण्यात मदत केली आहे. त्यामुळे भारताला वाढती मागणी पूर्ण करणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे रेडब्लू रेव्होल्यूशनचे ध्येय ग्रामीण बँकिंग आऊटलेट्सभोवती एक सामाजिक चळवळ उभारून त्यांना रंगांद्वारे आपली एक स्पष्ट ओळख निर्माण करण्याचे आहे.
स्पाइस मनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार म्हणाले की, “ग्रामीण भारताने अलीकडील वर्षांमध्ये डिजिटल वित्तीय सेवांमध्ये मोठी वाढ अनुभवली आहे. परंतु तरीही आपण फार प्रगती केलेली नाही. देशभरातील ग्रामीण बँकिंग आऊटलेट्ससमोर असलेले एक मोठे आव्हान म्हणजे त्यांच्या संबंधित क्षेत्रांमधील ग्राहकांमध्ये ते देत असलेल्या वित्तीय सेवांच्या ओळखीची आणि जागरूकतेची कमतरता हे आहे. स्पाइस मनीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ऐतिहासिक निमित्ताने रेडब्लू रेव्होल्यूशन आणून या समस्येवर उपाय काढण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्यामुळे या वर्गासाठी एक स्वतंत्र ओळख निर्माण होईल आणि स्मार्ट बँकिंग पॉइंट्सपर्यंत पोहोच वाढेल आणि देशभरातील ग्रामीण बँकिंग आऊटलेट्सपर्यंत पोहोचता येईल.”
रूरल बँकिंग आऊटलेट्स बँकिंग सहयोगी/ व्यापारी/ छोटे उद्योजक यांच्याकडून चालवले जातात. ते बँका किंवा बँकिंग भागीदारांचा एक विस्तारित भाग म्हणून काम करतात आणि भारताच्या कानाकोपऱ्यात बँकेच्या सेवा नसलेल्या समाजाला वित्तीय सेवांची डिलिव्हरी देतात. ते त्यांना औपचारिक वित्तीय यंत्रणेत आणण्यासाठीही मदत करतात. रेडब्लू रेव्होल्यूशन ग्रामीण बँकिंग आऊटलेट्सची व्याप्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि ग्रामीण व नागरी विभाजनाची दरी सांधण्यासाठी मदत करेल.
अधिक जाणून घेण्यासाठी आणि रेडब्लू रेव्होल्यूशनमध्ये सहभागी होण्यासाठी कृपया भेट द्या: https://www.redbluerevolution.com/