मुंबई, ०८ ऑगस्ट २०२२: एक आघाडीची ईएमएस कंपनी असलेल्या सिर्मा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेडने (“कंपनी”) आपल्या पहिल्या समभाग विक्रीसाठी प्रति समभाग ₹२०९ ते ₹२२० इतकी किंमत श्रेणी निश्चित केली आहे. कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री (“आयपीओ” किंवा “ऑफर”) शुक्रवार १२ ऑगस्ट २०२२ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुरुवार, १८ ऑगस्ट २०२२ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ६८ समभागांसाठी आणि तिथून पुढे ६८ समभागांच्या पटीत बोली लावू शकतात.
या आयपीओमध्ये एकूण ७६६ कोटी रुपयांच्या समभागांचा नवीन इश्यू आणि जास्तीत जास्त ३,३६९,३६० समभागांच्या ऑफर फॉर सेलचा (ओएफएस) समावेश आहे.
ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे प्रदान केली जात आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त ५०% ऑफर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल, जास्तीत जास्त १५% ऑफर बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्यांना वाटपासाठी उपलब्ध असेल आणि जास्तीत जास्त ३५% ऑफर किरकोळ वैयक्तिक बोली लावणाऱ्यांना वाटपासाठी उपलब्ध असेल.
संदीप टंडन आणि जसबीरसिंग गुजराल ह्या प्रमोटर्सच्या नेतृत्वाखालील सिर्मा एसजीएस ही एक तंत्रज्ञान-केंद्रित अभियांत्रिकी आणि डिझाइन कंपनी आहे जी टर्नकी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवांमध्ये (“ईएमएस”) सक्रिय असून प्रिसिजन उत्पादनात पारंगत आहे.
आयटी उद्योगातील हार्ड डिस्क ड्राईव्ह्ज आणि यूएसबी ड्राईव्ह्जसाठी लागणाऱ्या उच्च प्रिसिजन कॉइल्स; होम एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी सेट टॉप बॉक्सचे आवश्यक भाग; टेलिकॉम उद्योगासाठी ४G आणि आता ५G मॉड्यूल्स; ऑटोमोटिव्ह एंड यूज इंडस्ट्रीसाठी हॉल सेन्सर पीसीबीएज्, वाहन ट्रॅकिंग सिस्टम्स, टोल मॅनेजमेंट सिस्टम्स, बीकन्स, ४डब्ल्यू लाइटिंग सिस्टम बोर्ड, ईव्ही बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम्स; ग्राहक उत्पादने उद्योगासाठी ऑटोमॅटिक डिमर्स, इंडक्शन कूकटॉपचे भाग, बॉयलर मॅनेजमेंट पीसीबीए युनिट्स, एनर्जी एफिशिएंट इलेक्ट्रॉनिक इन्व्हर्टर्स, होम अप्लायन्स कंट्रोल पीसीबीएज्; हेल्थकेअर उद्योगाच्या गरजा पूर्ण करणारे डायरेक्ट डिजिटल डेंटल एक्स-रे एफजीपीए कंट्रोलर्स, एक्स-रे मशीन्ससाठी पीसीबीएज्, दृष्टिहीन व्यक्तींसाठी स्मार्ट केन्स, ऑप्थॅल्मोलॉजिकल (नेत्ररोगविषयक) ॲप्लिकेशन्ससाठी ऑगमेंटेड रिॲलिटी उपकरणे, यांसारख्या अनेक प्रकारच्या गोष्टींच्या उत्पादनाद्वारे कंपनी वैविध्यपूर्ण उद्योगांना सेवा पुरवते आणि २००४ मध्ये तिच्या स्थापनेपासून तिने खूप मोठा पल्ला गाठला आहे. ती भारतातील अग्रगण्य प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली उत्पादकांपैकी एक आहे आणि कस्टमाइज्ड आरएफआयडी टॅग्जच्या आघाडीच्या जागतिक उत्पादकांपैकी एक आहे.
कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड, ए. ओ. स्मिथ इंडिया वॉटर प्रॉडक्ट्स प्रा. लि., रॉबर्ट बॉश इंजिनिअरिंग अँड बिझिनेस सोल्युशन प्रा. लि., युरेका फोर्ब्स लिमिटेड, सायनकनोड लिमिटेड, ॲटमबर्ग टेक्नॉलॉजीज प्रा. लि. आणि टोटल पॉवर युरोप बी.व्ही. यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२० ते आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत कंपनीच्या टॉप १० आणि टॉप २० ग्राहकांकडून वॉलेटमधील एकंदर हिस्सा अनुक्रमे २६.२०% आणि २५.७९% सीएजीआरने वाढला.
कंपनी सध्या उत्तर भारतात (उदा. हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेश) आणि दक्षिण भारतात (उदा. तमिळनाडू आणि कर्नाटक) ११ मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सुविधांमध्ये आणि तीन समर्पित संशोधन व विकास केंद्रांद्वारे कार्यरत आहे, त्यापैकी दोन अनुक्रमे भारतातील चेन्नई, तामिळनाडू आणि गुडगाव, हरियाणा येथे आहेत आणि एक स्टुटगार्ट, जर्मनी येथे आहे.
औद्योगिक उपकरणे उद्योग, ग्राहक उत्पादने उद्योग, वाहन उद्योग, आयटी उद्योग आणि इतर उद्योगांशी संबंधित असलेल्या ऑपरेशन्समधून एसजीएस टेकनिक्स आणि परफेक्ट आयडी यांच्या महसुलाचा विचार करता, सिर्माच्या प्रोफॉर्मा ईबीआयडीटीए मध्ये आर्थिक वर्ष २०२० ते आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत अनुक्रमे १५.८३%, १५.११%, ३७.४०, ८२१.०३% आणि ४२६.५९% सीएजीआरने वाढ झाली.
डॅम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे रजिस्ट्रार आहेत. कंपनीचे समभाग बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.