बर्मिंगहॅम : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम लढतीत पी.व्ही.सिंधूने सुवर्णपदक मिळवले आहे.
पी.व्ही.सिंधूने कॅनडाच्या मिशेल लीचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. सिंधूच्या सुवर्णाने कॉमनवेल्थ स्पर्धेत( CWG ) आता भारताकडील एकूण पदकांची संख्या 56 झाली असून, यामध्ये 19 सुवर्ण पदके, 15 रौप्य पदके आणि 22 कांस्य पदकांचा समावेश आहे. या विजयासोबतच भारत न्यूझीलंडला मागे टाकत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.