भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. लक्ष्य सेनने पहिला गेम गमावला तरी त्याने दुसऱ्या सेटमध्ये २१-९ असे पुनरागमन करत मलेशियाच्या एनजी यी यॉंगचा लक्ष्य सेनने पराभव केला. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे 20 वे सुवर्णपदक आहे. त्याचबरोबर ८ ऑगस्ट सोमवारी भारताने बॅडमिंटनमध्ये हे दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे.
भारताचे पदक विजेते खेळाडू
सुवर्णपदक- 20
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन
रौप्यपदक- 15
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर.
कांस्यपदक- 22
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ , संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री.