मुंबई : पुणे येथे कोहिनूर ग्रुपच्या न्यू खराडीमधील कॅलिडो एक्स्पिरिअन्स सेंटरचे उद्घाटन दिग्गज क्रिकेट खेळाडू कपिल देव यांच्या हस्ते करण्यात आले.
व्हायब्रंट जीवनशैलीची झलक
कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते न्यू खराडी येथील अत्याधुनिक कॅलिडो एक्स्पिरिअन्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सन्माननीय अतिथी म्हणून कपिल देव उपस्थित होते आणि या खास कार्यक्रमासाठी कोहिनूर ग्रुपचे वरिष्ठ पातळीवरील अधिकारी आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. एक्स्पिरिअन्स सेंटरने न्यू खराडी येथील बांधकामाबाबत एका सुंदर रूपात सादरीकरण केले आणि कोहिनूर ग्रुपच्या सुप्रसिद्ध पोर्टफोलियोतील कोहिनूर कॅलिडोमधील व्हायब्रंट जीवनशैलीची झलक या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
या प्रसंगी न्यू खराडीच्या चॅनल पार्टनरची बैठकही पार पडली. या भव्य कार्यक्रमासाठी 1200 हून अधिक चॅनल पार्टनर एकत्र आले होते. त्यांनी या प्रसंगी आपले यश साजरे केले आणि न्यू खराडी येथील कोहिनूर कॅलिडोची पहिली झलक पाहिली.
निसर्गसौंदर्य आणि सुविधांनी सज्ज राहणीमान
या प्रसंगी व्यवस्थापकीय सहसंचालक विनीत गोयल म्हणाले की, “कपिल देव यांनीच एक्स्पिरिअन्स सेंटरचे उद्घाटन केल्याने प्रत्येक जण खूप आनंदी होता. त्याचप्रमाणे कोहिनूर कॅलिडोमध्ये असलेल्या संधींचा लाभ घेण्यासही प्रत्येक जण रोमांचित होता. निसर्गसौंदर्य आणि सुविधांनी सज्ज शहरी राहणीमान यांचा मेळ साधलेल्या त्यांच्या ऑफरने सर्वांनाच अचंबित केले आहे. या प्रसंगी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल आणि व्यवस्थापकीय सहसंचालक राजेश गोयल उपस्थित होते. कपिलदेव यांनी दिलेली प्रेरणा व त्यांनी सेंटरचे उद्घाटन केल्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील, असे गोयल म्हणाले.
आर्ट ऑफ शेकिंग हँड्स
आर्ट ऑफ शेकिंग हँड्स या तत्वावर कोहिनूर ग्रुपचा विश्वास आहे. या तत्वामध्ये सौहार्द वाढविणे, परस्परांना सहकार्य करणे, एकसंध म्हणून काम करणे व सोबत प्रगती करणे समाविष्ट आहे. कोरेगाव येथील वेस्टइन पुणे येथे कोहिनूर ग्रुपच्या इन्फिनिटी व टायटेनिअम पार्टनरचा हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक संधीचा लाभ घेणारे व असामान्य कामगिरी करणारे अशी ओळख असलेल्या या पार्टनर्सनी भोजनाच्या निमित्ताने परस्परांशी संवाद साधला. आर्ट ऑफ शेकिंग हँड्स प्रति असलेल्या आपल्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि कपिल देव यांच्या प्रेरणादायी गप्पांचा आस्वाद घेतला.