मुंबई : ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्स इलिस यांना मुंबईचा वडापाव फार आवडतो. इतकेच नव्हे तर मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात त्यांना देण्यात आलेल्या मेजवनीत खास वडपावचा बेत आखण्यात आला होता.
हे तर गरीब माणसाचे अन्न
उदभरणात वडापाव हा शेवटचा खाद्यपदार्थ. त्यामुळे जिद्दी माणूस ‘वडा-पाव’ खाऊन तरी दिवस काढीन असे म्हणतो, तर गरीब माणूस “काढतो वडा-पाव खाऊन दिवस” असे म्हणतो. तर पंचपक्वान्न खाणारा माणूस “आज वडा-पाव”चा बेत करूया, असे म्हणतो. आजची तरुणाई सुद्धा घाईगडबडीत इन्स्टंट फूड म्हणून ‘वडा-पाव’चा आस्वाद घेत. असा हा वडा-पाव ब्रिटिश उच्चायुक्तांना आवडतो म्हटल्यानंतर आपल्या भुवया उंचावल्या असतील; पण हे खरे आहे. मंत्रालयातील त्यांच्या चहा-पानाच्या कार्यक्रमात वडा-पावचा समावेश होता.
इंग्लंडमध्येही लोकप्रिय
अलेक्स इलिस यांना मुंबईचा वडापाव फार आवडत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या आदरातिथ्यामध्ये वडापावचा आवर्जुन समावेश करण्यात आला. वडापावचा अतिशय आनंदाने आस्वाद घेताना श्री. इलिस यांनी इंग्लंडमध्येही वडापाव आता लोकप्रिय होत असल्याचा उल्लेख केला.
अलेक्स इलिस यांनी मुंबईच्या वडापावची स्तुती केली. मुंबईच्या वडापावचा स्वाद साता समुद्रापार पोहोचल्याने गरिबांचे हे अन्न आता खिशाला न परवडण्याइतके महाग होऊ नये हीच अपेक्षा!