Mumbai/NHI NEW AGENCY
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर चषक १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क बुध्दिबळ स्पर्धेमधील १२ वर्षाखालील गटात अनन्या चव्हाण, पृथ्वीराज देढीया, शुभदा पाताडे, अन्वी अग्रवाल, आहन चौधरी आदींनी सलामीचे साखळी सामने जिंकले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित शालेय बुध्दिबळ स्पर्धेमध्ये अनन्या चव्हाणने काळ्या मोहरांनी खेळतांना शिवांग अग्रवालच्या राजाला १९ व्या मिनिटाला शह दिला आणि पहिला साखळी गुण वसूल केला.
दुसऱ्या पटावर पृथ्वीराज देढीयाने राणी व हत्तीच्या उत्तम चाली रचत आणिका अवस्थीच्या राजाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. अन्य साखळी सामन्यात शुभदा पाताडेने क्यरा चौधरीचा, अन्वी अग्रवालने मृणांक हाथीचा, आहन चौधरीने वेदांश कंसालचा, विहान मल्होत्राने अनेका कौरचा तर साईराज बागकरने जियान पारीखचा पराभव करून विजयी प्रारंभ केला. अंधेरी येथील १२ वर्षाखालील गटाच्या स्पर्धेत उदयोन्मुख सबज्युनियर खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद लाभला. शालेय मुलामुलींच्या आग्रहास्तव त्यांच्या शालेय परिसरात विभागवार स्पर्धा होण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, प्रमुख पंच विशाल माधव व अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी विशेष प्रयत्नशील आहेत. स्पर्धेचा अंतिम टप्पा १९ मार्च रोजी परेल येथील आरएमएमएस सभागृहात संपन्न होईल.
******************************