मुंबई हॉस्पीटलचा इशारा-: झोपेची कमतरता म्हणजे नशेत गाडी चालवण्यासमान- जागतिक निद्रा दिनाच्या निमित्ताने सावधानतेचा इशारा
मुंबई, – जागतिक निद्रा दिनाचे औचित्य साधून वोक्हार्ट हॉस्पीटल्स, मुंबई यांनी झोपेची कमतरता व त्याचे दूरगामी परिणाम विशेषत: झोपेच्या अंमलाखाली गाडी चालवण्यासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे. वोक्हार्ट हॉस्पीटल्स, मुंबई सेंट्रल येथील प्रसिध्द न्युरॉलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखिजा यांनी जागतिक आरोग्यासाठी झोपेतील समानता जाहीर करण्याची गरज अधोरेखित करणारा दृष्टीकोन पत्रकार परिषदेच्या दरम्यान स्पष्ट केला.
झोपेवरील नेहमीची पठडीतील चर्चा सोडून, डॉ. मकिजा यांनी झोपेच्या अभावामुळे खऱ्या आयुष्यात उद्भवणारे गंभीर प्रसंग किंवा संकटे यांच्यावर प्रकाश टाकला. चेर्निबल अणू प्रकल्प दुर्घटना, भोपाळ गॅस दुर्घटना, यूएस स्पेस शटल चँलेंजर दुर्घटना, आणि व्हॅल्डेझ इंधन गळती यामध्ये काही प्रमाणात का होईना पण झोपेच्या कमतरतेचे परिणामांचा भाग होता. या दुर्घटना निर्णय प्रक्रिया व एकूणच सुरक्षिततेवर अपुऱ्या झोपेचे होणाऱ्या गंभीर परिणामांची स्पष्ट आठवण करुन देणाऱ्या आहेत.
या संदर्भात जागतिक स्तरावर पालन केल्या जाणाऱ्या आणि विशेषत: अन्य देशांमध्ये, जेथे व्यावसायिक टॅक्सी ड्रायव्हर्सना मध्यम ते गंभीर ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया सिंड्रोमचा (OSAS) सर्वांत जास्त धोका आहे, अशांबद्दल त्यांनी संशोधन केले. या निरीक्षणामुळे भारतामध्ये वाहन चालवण्यासाठी योग्य म्हणून व्यावसायिक ड्रायव्हर्सना परवाना देण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय तपास धोरणांबाबत माहिती देण्यासाठी अधिक व्यापक संशोधनाची गरजही स्पष्ट होते. झोपेशी संबंधित परिस्थितीशी निगडीत संभाव्य धोके लक्षात घेऊन ड्रायव्हर्सचे आरोग्य हे चांगले असण्याची खात्री करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
जागतिक निद्रा दिनाचा मुख्य संदेश “ जागतिक आरोग्यासाठी झोपेची समानता”- देताना- डॉ. मखिजा यांनी झोपेचे नैसर्गिक, साचलेली किंवा साठवलेली झोप आणि शारीरिक स्वरुपाची झोप यांवर भर दिला. त्यांनी साठवलेली झोप ते उर्जा संचयन ते स्मरणशक्ती, एकाग्रता आणि पचनसंस्थेचे नियमन अशा झोपेच्या विविध कार्यांचे सर्वसमावेशक चित्र रेखाटले. विविध वयोगटासाठी आवश्यक असलेली वेगवेगळ्या प्रमाणातील झोपेची गरज यावरही न्युरॉलॉजिस्ट डॉ. मखिजा यांनी प्रकाश टाकला तसेच अपुऱ्या झोपेचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांवरही त्यांनी भर दिला.
झोपेची कमतरता आणि झोपेच्या अंमलाखाली गाडी चालवण्याची प्रत्यक्ष प्रकरणे जेव्हा त्यांनी सांगितली, तसेच अपुऱ्या झोपेमुळे निर्माण झालेल्या सतर्कतेच्या अभावामुळे निर्माण करणारी प्रत्यक्षातील उदाहरणेही त्यांनी सांगितली, तेव्हा पत्रकार परिषदेने एक महत्त्वाचे वळण घेतले. यामध्ये पायलट व कॅब ड्रायव्हर्स कसे महत्त्वाच्या वेळेस झोपतात याबद्दल इंडोनेशियात नुकत्याच घडलेल्या एका विशिष्ट घटनेचा संदर्भही देऊन त्यांनी उदाहरणे सांगितली. इंडोनेशियामध्ये झोपेच्या कमतरेमुळे सजगता नसल्याने एक विमान त्याच्या नेहमीच्या मार्गापासून जवळपास २८ मिनिटे दूर गेले होते.
यामध्ये नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेचाही समावेश होता, ज्यामध्ये इंटेल-इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनी यांना सायकलिंग करत असताना एका कॅब चालकाच्या धडकेत जीव गमवावा लागला. आपण झोपेत होतो आणि त्यामुळे नवी मुंबईत सैनी यांच्या सायकलला धडक दिल्याचे या कॅब चालकाने कबूल केले. यामुळे तंद्रीमध्ये किंवा झोपेच्या अंमलाखाली गाडी चालवण्याचे गंभीर धोके अधोरेखित करतातच पण त्याचबरोबर झोपेसाठी सर्वच उद्योगक्षेत्रांमध्ये व्यापक किंवा सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वांची तातडीची गरजही स्पष्ट करतात.
“आपण आपले काम व आरोग्य यांच्यात अत्यंत नाजूक असा समतोल साधताना, कॉर्पोरेट व सरकारी संस्था या दोघांनीही आपल्या कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या क्षमतांवर व सार्वजनिक सुरक्षिततेवर झोपेचे होणारे गंभीर परिणाम ओळखणे अत्यावश्यक आहे. कर्मचाऱ्यांना झोपेची कमतरता आहे का याची लक्षणे ओळखण्यासाठी आणि त्याचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच गंभीर अपघात टाळण्यासाठी धोरणे तयार करण्यासाठीची यंत्रणा तयार करुन, झोपेतील समानता ही फक्त वैयक्तिक जबाबदारी नसून आपल्या जागतिक समुदायाच्या आरोग्य व कल्याणासाठीच्या सामुदायिक जबाबदारीसाठी आपल्याला एकत्रित योगदान देण्यासाठी आपण कटिबध्द आहोत,” अशी अंतिम टिप्पणी करत डॉ. मखिजा यांनी झोपेच्या गरजेबद्दल महत्त्वाचे प्रतिपादन केले.
जागतिक निद्रा दिनाच्या निमित्ताने, झोपेच्या समानतेवर जागतिक संवादात योगदान देण्यासाठी वोक्हार्ट हॉस्पीटल्स, मुंबई सेंट्रल कटिबधद् असल्याचे स्पष्ट केले. रुग्णांची सुरक्षितता व काळजीची गुणवत्ता याला प्राधान्य देऊन विविध समुदायांमध्ये झोपेच्या अधिक आरोग्यपूर्ण सवयींना प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी हॉस्पीटल ठाम उभे आहे.