~ ही भारतातील सर्वात मोठ्या डिस्टिलरीं पैकी एक असेल ज्याची क्षमता दररोज 60K लीटर ताजे माल्ट स्पिरिट उत्पादन करण्याची क्षमता आहे.
~ या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक परिदृश्य बदलण्याच्या उद्देशाने, पेर्नोड रिकार्ड इंडिया या गुंतवणुकीकडे स्थानिक समुदायाच्या वाढ आणि विकासासाठी एक अविभाज्य चालक म्हणून पाहते.
नागपूर : महाराष्ट्र सरकार आणि वाइन आणि स्पिरीट उद्योगातील जागतिक स्तरावरील अग्रगण्य पेर्नोड रिकार्ड इंडियाने आज महाराष्ट्र नागपुरातील बुटीबोरी या औद्योगिक उपनगरात भारतातील सर्वात मोठ्या माल्ट स्पिरिट डिस्टिलरीजची स्थापना करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’च्या दृष्टिकोणला पुढे नेत, पेर्नोड रिकार्ड इंडियाने या दशकात 200 मिलियन युरो पर्यंत गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. या सामंजस्य करारावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत; महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री श्री. शंभूराज देसाई; डॉ. हर्षदीप कांबळे प्रिन्सिपल सेक्रेटरी (इंडस्ट्रीज) यांच्यासोबत पेर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जीन टुबूल, प्रसन्न मोहिले नॅशनल कॉर्पोरेट अफेअर्स हेड पेर्नोड रिकार्ड इंडिया आणि गगनदीप सेठी, सिनिअर व्हीपी, इंटिग्रेटेड ऑपरेशन्स, पेर्नोड रिकार्ड इंडिया यांनी स्वाक्षरी केली.
ही डिस्टिलरी सुरू केल्यावर, पेर्नोड रिकार्ड इंडियाचे उद्दिष्ट 700 ते 800 कामगारांना रोजगार देण्याचे आहे. ही बांधिलकी केवळ डिस्टिलरीच्या बांधकामाच्या टप्प्यापर्यंतच नाही, तर प्लांटच्या कार्यान्वित झाल्यानंतरच्या कार्यापर्यंत देखील विस्तारित आहे. जो संपूर्ण प्रदेशातील अप्रत्यक्ष रोजगार संधींवर सकारात्मक परिणाम करेल.
अल्को-बेव्ह उद्योगातील जागतिक आघाडीवर असलेल्या पेर्नोड रिकार्ड ग्रुपसाठी भारत एक महत्वपूर्ण बाजारपेठ असल्याचे सिद्ध झाले आहे. पेर्नोड रिकार्ड इंडिया केवळ देशात गुंतवणूक करण्यासाठीच नाही, तर शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करून स्थानिक समुदायांसाठी रोजगाराच्या संधी आणि कौशल्य विकास उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील वचनबद्ध आहे.
या प्रकल्पासह, पेर्नोड रिकार्ड इंडियाने अखेरीस देशभरातील शेतकऱ्यांकडून वार्षिक आधारावर 50,000 टन पर्यंत जव खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आगामी काळात, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जव लागवडीची क्षमता विकसित करण्यासाठी सरकारसोबत संयुक्तपणे काम करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी बोलताना म्हणाले, “आमचा विश्वास आहे की पायाभूत सुविधांचा विकास ही कोणत्याही राज्याच्या प्रगतीसाठीची पहिले पाऊल आहे आणि आम्हाला आनंद होत आहे की पेर्नोड रिकार्ड इंडियाने या प्रदेशाच्या आणि देशाच्या आर्थिक आणि कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक करण्याचा आमचा दृष्टीकोन साकार केला आहे. या डिस्टिलरीच्या स्थापनेमुळे रोजगाराच्या मजबूत संधी निर्माण होण्यास आणि सहाय्यक उद्योग आणि सेवांचा विकास होण्यास मदत होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते या प्रदेशातील हजारो शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळविण्यासाठी आणि कृषी विविधता आणि स्थैर्य आणण्यासाठी काम करेल.”
महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआयडीसी) आणि पेर्नोड रिकार्ड इंडिया सक्रियपणे एकत्र काम करत आहेत आणि त्यांनी डिस्टिलरी बांधण्यासाठी योग्य जागा शोधली आहे. एमआयडीसीने आवश्यक सहकार्य व मदतीचा हात पुढे केला आहे, महाराष्ट्र राज्यात प्रकल्पाच्या यशाचा मार्ग मोकळा करण्यासाठी नियामक परवानग्या दिल्या आहेत.
जीन टुबूल, सीईओ, पेर्नोड रिकार्ड इंडिया, म्हणाले, “महाराष्ट्रातील नागपुर येथे स्थापन होणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या माल्ट स्पिरिट डिस्टिलरीं सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम भारतात मेक आणि इनोव्हेट करण्याच्या आमच्या समर्पित प्रयत्नांच्या पुढे सातत्याने सुरू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, यामुळे जागतिक नकाशावर भारताचे स्थान उच्च-गुणवत्तेच्या माल्टच्या उत्पादनामध्ये उंचावेल. या डिस्टिलरीच्या स्थापनेमुळे नागपूर आणि महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांना चालना मिळेल. शिवाय, स्थानिक उद्योजक आणि शेतकरी समुदायाला विकासाचे नवीन मार्ग उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट या प्लांटच्या स्थापनेचे असेल. 30 वर्षांहून अधिक काळ अल्को-बेव्ह सेगमेंटमधील एक प्रमुख म्हणून, सर्वसमावेशक आणि सतत विकास हा आपल्या भारताच्या धोरणाचा केंद्रबिंदू आहे. असाच दृष्टीकोन असलेल्या महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याचा आम्हाला सन्मान वाटतो.”
माल्ट स्पिरिट डिस्टिलरी सुरुवातीपासूनच विविध प्रक्रियांमध्ये टिकाऊ पद्धती आणि तंत्रज्ञान एकत्रित करेल.
पेर्नोड रिकार्ड इंडियाचे उद्दिष्ट देशाच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीला गती देण्याचे आहे. या गुंतवणुकीसह, कंपनी शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाचा पाया रचत आहे, जे कालांतराने समुदायांसाठी जीवनरेखा बनेल, आर्थिक चैतन्य वाढवेल, सामाजिक एकता वाढवेल आणि आनंददायक अनुभव निर्माण करेल.