मुंबई ‘NHI NEWS
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित श्री शिवाजी मंदिर बुध्दिबळ स्पर्धेत लोबो देटीनने ७ व ८ वर्षाखालील मुलांचे विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट पटकाविला. ८ वर्षाखालील गटात अपराजित लोबोने (५ गुण) ओमिशा अरोराला सहज चकवून मुलाचे विजेतेपद पटकाविले. मुलांमध्ये ओम गणूने (४ गुण) द्वितीय, प्रथम मेहताने ( ४ गुण) तृतीय, मालव देसाईने (३ गुण) चतुर्थ, आर्शिव गोयलने (२.५ गुण) पाचवा तर मुलींमध्ये अनिश्का बियाणीने (३ गुण) प्रथम, ओमिशा अरोराने (३ गुण) द्वितीय, अनन्या चव्हाणने (३ गुण) तृतीय क्रमांक मिळविला.
मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने झालेल्या स्पर्धेत १० वर्षाखालील मुलांमध्ये निवान छेडाने (४.५ गुण) प्रथम, नील भटने (४ गुण) द्वितीय, रुद्रांश पाटीलने (४ गुण) तृतीय, आरिष गांधीने (३.५ गुण) चौथा, जश पारीखने (३ गुण) पाचवा आणि मुलींमध्ये सर्वा परेलकरने (४ गुण) प्रथम, आराध्या पुरोने (३ गुण) द्वितीय, येशा तयालने (३ गुण) तृतीय पुरस्कार मिळविला. १२ वर्षाखालील मुलांमध्ये अमोघ आंब्रेने (५ गुण) प्रथम, लोबो फेरदिनने (४ गुण) द्वितीय, निशांत पन्हाळकरने (३.५ गुण) तृतीय, विवान कांबळेने (३.५ गुण) चौथा, अमान गुप्ताने ( ३ गुण) पाचवा आणि मुलींमध्ये वर्री गोगरीने ( ३ गुण) प्रथम, साईशा मुळेने (३ गुण) द्वितीय, शहाना कृष्णनने (२.५ गुण) तृतीय क्रमांक जिंकला. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात अर्णव सावंतने प्रथम (४.५ गुण), अर्जुन पाधारीयाने (३.५ गुण) द्वितीय, अंशुमन समलने (३.५ गुण) तृतीय, आयुष पाटीलने ( ३ गुण) चौथा, अग विहानने (३ गुण) पाचवा आणि मुलींमध्ये मल्लिक भाविनीने (२.५ गुण) प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंडळाचे अध्यक्ष सुधीर सावंत, सेक्रेटरी संतोष शिंदे, कार्यकारी विश्वस्त बजरंग चव्हाण, विश्वस्त ज्ञानेश महाराव, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
******************************