मुंबई, 15 डिसेंबर 2023 : अल्कोहोलयुक्त पेयांचा निर्मिती करण्याचा वारसा असलेल्या साउथ सीज डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ‘क्रेझी कॉक’ ही त्यांचा पहिला डायरेक्ट टू कन्झ्युमर/ रिटेल व्हिस्की ब्रँड लाँच करण्यास सज्ज आहे. हे नाव म्हणजे पौराणिक कोंबड्याला समर्पित केलेल काव्य असून स्थानिक पातळीवर उत्पादन केलेल्या व्हिस्कीच्या नव्या युगाचे हे द्योतक आहे. या व्हिस्कीला भारतीय उपखंडाच्या वारशाचा स्पर्श लाभला आहे आणि जगभरातील व्हिस्कीप्रेमींसाठी उत्तम फ्लेवर्सच्या व्हिस्कीची निर्मिती केली आहे.
हा एक्सक्लुझिव्ह ब्रँड सादर करत कंपनीने सिंगल मॉल्ट व्हिस्कीची निर्मिती करताना ती परिपूर्ण बनवण्याचा आणि प्रस्थापित वारसा एका नव्या उंचीवर नेला आहे. क्रेझी कॉक ही सिंगल मॉल्ट व्हिस्की इतरांपेक्षा उठून दिसते. कारण उत्तर भारतातील निसर्गसुंदर मैदानी प्रदेशांमधून चोखंदळपणे निवडलेल्या 6-रो भारतीय बार्लीपासून या व्हिस्कीची निर्मिती करण्यात आली आहे. तांब्याच्या भांड्यांच्या पारंपरिक पद्धतीचा उपयोग करून बार्लीवर मॉल्टिंग व डिस्टिलेशनची प्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे चवींचे नाजूक आणि मंद गंधांचे मिश्रण तयार होते. त्यानंतर व्हिस्की एक्स-बरबॉनमध्ये व एक्स-शेरी कास्क्समध्ये परिपक्व करण्यात येते. त्यामुळे या पेयाला एक फुल-बॉडी (वाइन टेस्टिंगमधली एक संज्ञा, म्हणजे तोंडात जाणवणारी घट्ट, ओघवती), आगळवेगळी चव प्राप्त होते. खास स्मोक केलेल्या बॅचेसमुळे क्रेझी कॉक धुवाला सेंद्रिय मृत्तिकेचा स्वाद मिळतो. मास्टर ब्लेंडर्सनी अत्यंत काळजीपूर्वक निवडलेली प्रत्येक अभिजात सिंगल मॉल्ट ही लहान बॅचेसमध्ये परफेक्शनची खात्री देते. या व्हिस्कीचा रंग नैसर्गिक असतो आणि नॉन-चिल फिल्ट्रेशनचा वापर केला जातो. त्यामुळे व्हिस्कीप्रेमींना या पेयाचा आस्वाद घेण्याचा अस्सल अनुभव प्राप्त होतो.
क्रेझी कॉक सिंगल मॉल्ट व्हिस्की दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल :
रेअर (दुर्मीळ) – डबल ओकमध्ये साठवलेली
फुल बॉडी दुर्मीळ व अत्यंत खास सिंगल मॉल्ट व्हिस्की, जी आयात केलेल्या बरबन पिंप व शेरी पिंप या आयात ओक पिंपांमध्ये परिपक्व करण्यात येते. ही असामान्य व्हिस्की अत्यंत चलाखीने दोन्ही पिंपांचा अजोड संयोग साधते. परिणामी एक उत्तम व्हिस्कॉसिटी प्राप्त होते. त्यामुळे चोखंदळांना सुखावणारा अनुभव प्राप्त होतो. गडद ॲम्बर रंग घ्राणेंद्रियाला तृप्त करतो. फुले, मध, पेर, चॉकलेट, रेझिन,
दालचिनी, मसाले, व्हॅनिला आणि ओकच्या सुगंधाच्या एकत्रित मिश्रणाचा दरवळ या व्हिस्कीला आहे. जीभेला याची काहीशी कडक, उबदार, मसालेदार आणि त्याचसोबत उन्हाळी फळे, रेझिन्सची चव जाणवते आणि या पेयाचा गुळगुळीत पोत सुखावह असतो. या व्हिस्कीचा घोट घेतल्यावर त्याच्या समेवर ही चव रेंगाळते आणि ही असामान्य रचना रंध्रारंध्राला खुश करते.
धुवा – द पीटेड वन
धुवा म्हणजे धूर. ही व्हिस्की फुल बॉडी, सौम्य सेंद्रिय मृत्तिकेचा, दुर्मीळ स्वाद असलेली व अत्युत्कृष्ट सिंगल मॉल्ट आहे. ही व्हिस्की आयात बरबॉन व दुर्मीळ शेरी पिंपांमध्ये परिपक्व केली आहे. यासाठी आमच्या मास्टर ब्लेंडर्सनी चांगलेच वय असलेल्या व मधुर पीटेड मॉल्ट्सपासून ही संतुलित व्हिस्की तयार केली आहे. या व्हिस्कीला गडद अँटिक सुवर्ण रंग आहे आणि या सौम्य पीट व धुराचा स्वाद आहे. त्यात मनुका, डार्क चॉकलेट, दालचिनी, व्हॅनिला आणि मँडारिनचा मिश्र गंध नाकाला जाणवतो. धूरकट मसाले, मनुके, दालचिनीचा स्पर्श आणि संतुलित गोडूस चव लाभलेली ही व्हिस्की समेवर जाऊन एक उबदार व रेंगाळणारी चव सादर करते. ही व्हिस्की म्हणजे खऱ्या अर्थाने एक मास्टरपीस आहे.
“जागतिक पातळीवर असलेल्या विविध स्पिरिट्सच्या भाऊगर्दीत भारतीय व्हिस्कीला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले आहे. जगातील काही आघाडीच्या अल्कोहोल पेय कंपन्यांचा आमच्या क्लाएंट्स आहेत. हे आमच्या दीर्घकालीन भागीदारीचे द्योतक आहे. पूर्वी आम्ही कॉर्पोरेट्सना पुरवठा करत होतो आता लक्झरी शैली असलेल्या चोखंदळ वैयक्तिक ग्राहकांना आम्ही समाधानी करू इच्छितो. गेल्या तीन पिढ्यांपासून आम्ही हि डिस्टिलेशनची कला जोपासत आहोत. हा उपक्रम म्हणजे आमच्या चिरकालीन कारागिरीचा उत्सव आहे. यापुढेही आम्ही क्रेझी कॉकच्या बॅनरखाली विविध प्रकारच्या असामान्य व्हिस्की तयार करत राहू.”, असे श्री. एच. व्ही चिनॉय म्हणाले.
सर्वांमधले एक होण्यापेक्षा सर्वांमध्ये उठून दिसावे हे क्रेझी कॉकचे तत्व आहे. चाकोरी भेदण्यावर आणि एकाच चक्रात अडकून बसलेल्यांविरुद्ध सौम्य बंड करण्याची क्रेझी कॉकची वृत्ती आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या बंधनांवर प्रश्न विचारणे, जाब विचारणे आणि आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करत राहणे आणि चाकोरी नाकारणे हे क्रेझी कॉकचे मर्म आहे. क्रेझी कॉकमध्ये एक वेगळाच विक्षिप्तपणा आहे, काहीसे बिनधास्त आहेत आणि आपल्यातील वैशिष्ट्य स्वीकारून आपला स्वतःचा मार्ग चोखाळण्याकडे त्यांचा कल आहे.
भारतात व जगभरात आपली परिवर्तीत चव सादर करण्याचा क्रेझी कॉकचा मानस आहे. लक्झरीच्या या जगात आपला ठसा उमटविण्यास क्रेझी कॉक सज्ज झाले आहेत. प्रारंभी हा ब्रँड मुंबई, गोवा आणि हरियाणामध्ये उपलब्द होईल आणि येत्या काही महिन्यात तो इतर ठिकाणीही उपलब्ध होईल.
साउथ सीज डिस्टिलरीज (एसएसडीबी) 1984 मध्ये महाराष्ट्रातील निसर्गरम्य किनारपट्टीच्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. ही आघाडीची भारतीय नॉन-गव्हर्न्मेंटल कंपनी आहे. स्पिरिट्सच्या जगात ही कंपनी उत्कृष्टतेचा दीपस्तंभ म्हणून उभी आहे. एसएसडीबीचा चार दशकांचा दैदिप्यमान इतिहास असून या कंपनीने म्हणजे नावीन्यता, दर्जा व असमान्य उत्पादने सादर करण्याच्या निर्धारांचा आदर्श घालून दिला आहे.