कोल्हापूर : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची संपूर्ण राज्यभरात शिवसंवाद यात्रा सुरू आहे. कालपासून ते कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. येथील आजरा येथे झालेल्या सभेनंतर कोल्हापुरातील सभेलासुद्धा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे झालेल्या सभेत तर जनतेचा आपल्याला मिळत असलेल्या प्रतिसाद पाहून आणि भरपावसातसुद्धा नागरिकांनी लावलेली उपस्थिती पाहून आदित्य ठाकरे यांनी स्टेजवरून खाली येऊन जनतेतून दमदार भाषण केले. शिवाय बंडखोर आमदार आणि खासदारांसह भाजप आणि विद्यमान राज्यपालांवरसुद्धा जोरदार टीका केली. आजसुद्धा शिरोळ येथे सभा होणार असून, त्याचीसुद्धा जोरदार तयारी करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे
कोल्हापुरातील सभेपेक्षाही आजरा येथील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद : कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे झालेल्या सभेला मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, काल दुपारी आजरा येथे झालेल्या सभेला त्यापेक्षाही अधिक गर्दी पाहायला मिळाली. सभास्थळी आसनव्यवस्थासुद्धा करण्यात आली नव्हती. तरीही ठाकरे येण्यापूर्वी तासभर सभास्थळी उभे असल्याचे दिसून आले. शिवाय बंडखोरांविरोधात शिवसैनिकांमध्ये असलेली चीडसुद्धा या ठिकाणी प्रकर्षाने जाणवली. कोल्हापूर शहरातसुद्धा रात्री मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
चंद्रदीप नरके यांची अनुपस्थिती : दरम्यान, कोल्हापूर शहरात पार पडलेल्या भव्य सभेमध्ये शिवसेनेचे दोन माजी आमदारांनी अनुपस्थिती दर्शवली. करवीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी या सभेला येणे टाळल्याचे दिसले. शिवाय वेळोवेळी कोल्हापुरात झालेल्या मोर्चामध्येसुद्धा यांनी सहभाग नोंदवला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.
शिंदेंनी घेतली चंद्रदीप नरके यांची भेट : मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर असताना चंद्रदीप नरके यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे अजूनही ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे माजी आमदार सुजित मिनचेकर हेसुद्धा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांना भेटायला गेले होते. त्यामुळे त्यांचे नाव शिंदे गटासोबत जोडले गेले. मात्र, कालच्या आदित्य ठाकरे यांच्या सभेवेळी सुजित मिनचेकर यांनी उपस्थिती दर्शवली. शिवाय शाहुवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनीसुद्धा उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे हे अजूनतरी शिवसेनेसोबत असल्याचे दिसून येते.
हे सरकार कोणत्याही पद्धतीने कोसळणारच : दरम्यान, हे जम्बो कॅबिनेटचे सरकार आहे. दोन मंत्री असणारे हे जम्बो कॅबिनेट आहे. एक मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री मात्र यामध्ये खरा मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण हेच अजून समजले नसल्याची टीकासुद्धा कालच्या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी केली. खरंतर गद्दार लोकांना अजूनही वाटत असेल आपली चूक झाली आहे. तर त्यांनी परत यावे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन मोठे आहे. त्यांना नक्की परत स्वागत करू. मात्र, जे काही नाईलाजाने गेले आहेत, काही लोभापाई गेले आहेत त्यांनी हिम्मत असेल तर आता राजीनामा द्यावा आणि निवडणुकांना सामोरे यावे. आपल्याला आपली जागा दाखविल्याशीवाय शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले. शिवाय मध्यावधी या निश्चित आहेत. त्यापूर्वी बंडखोरांनी राजीनामे द्यावेत आणि निवडणुकीला सामोरे जावे असे आव्हान केले.
असा राजकीय राज्यपाल कधी पाहिला नाही : दरम्यान, मी लहानपणापासून सर्वच राज्यपाल पाहिले आहेत, त्यांना भेटलो आहे. मात्र, विद्यमान राज्यपालांसारखे राजकीय राज्यपाल कधीही पाहिले नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी सभेत केली. ज्या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत, ते खूप घातक आहे. शिवाय नुकतेच महाराष्ट्राबाबत केलेलं वक्तव्य तर फारच घातक असल्याचे म्हणत मराठी आणि अमराठी मते फोडण्याचे काम ते करत असल्याचेही त्यांनी म्हंटले