MUMBAI-NHI
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बालदिनानिमित्त झालेल्या एलआयसी-आयडियल कप बुध्दिबळ स्पर्धेतील विविध ३ वयोगट मुलांमध्ये लोबो दैतीन, गिरीश पै, हृदय मणियार आणि मुलींमध्ये माय्रा गोगरी, निविता गाला, शहाना कृष्णन यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत फिडे गुणांकितसह राष्ट्रीय व राज्य असलेल्या बालबुद्दीबळपटूच्या सहभागाने रंगलेल्या स्पर्धेला आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना यांचे सहकार्य लाभले होते. माजी क्रीडापटू व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, मनोहर गोराठे, संजय पेडणेकर, चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
एलआयसी-आयडियल कप बुध्दिबळ स्पर्धेतील ७ वर्षाखालील मुलांमध्ये अपराजित लोबो दैतीनने (५ गुण) प्रथम, अभिनंदन अरीकृष्णनने (४ गुण) द्वितीय, धैर्य अगरवालने (४ गुण) तृतीय तर मुलींमध्ये माय्रा गोगरीने (३ गुण) प्रथम, निवी मेननने (२ गुण) द्वितीय, रायकाह अगरवालने (२ गुण) तृतीय पुरस्कार जिंकला. ९ वर्षाखालील मुलांमध्ये फिडे गुणांकित गिरीश पैने (४ गुण) प्रथम, नचिकेत अयरने (३.५ गुण) द्वितीय, आरिष गांधीने (३.५ गुण) तृतीय तर मुलींमध्ये निविता गालाने (३ गुण) प्रथम, आराध्या पुरोने (२ गुण) द्वितीय, श्रव्या कांबळेने (२ गुण) तृतीय स्थान मिळविले. ११ वर्षाखालील मुलांमध्ये फिडे गुणांकित अपराजित हृदय मणियारने (५ गुण) प्रथम, एम. पी. आनंथाजीठने (४ गुण) द्वितीय, विवान कांबळेने (३ गुण) तृतीय तर मुलींमध्ये शहाना कृष्णनने (२.५ गुण) प्रथम, सैशा मुळेने (२ गुण) द्वितीय, हुसैना राझने (२ गुण) तृतीय क्रमांक पटकाविला. एलआयसी – आयडियल कप बुध्दिबळ स्पर्धेचे मुंबई दूरदर्शन-सह्याद्री चॅनेलवर क्रीडांगणमध्ये २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.०० वा. ते ६.३० वा. प्रक्षेपण होणार आहे.