*आव्हानात्मक आर्थिक स्थिती, आकुंचित रोखता आणि वाढत्या महागाईतही एयू बँकेची वित्त वर्ष 24 च्या दुसऱ्या तिमाहीत सातत्यपूर्ण कामगिरी*
*ठेवींमध्ये वार्षिक ३० टक्के वाढ कर्जवितरणात वार्षिक २४ टक्के वाढ, निव्वळ नफ्यात वार्षिक १७ टक्के वाढ, आरओए आणि आरओई अनुक्रमे १.७ टक्के आणि १३.९ टक्के*
ठळक मुद्दे
· पुर्व तरतूद सामान्य नफ्यात वार्षिक ३० टक्के वाढ होऊन ६४८ कोटी रुपयांवर, आर्थिक वर्ष २४ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी निव्वळ व्याज उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढून १२४९ कोटी रुपयांवर तर निव्वळ व्याज मार्जिन ५.५ टक्के
· यंदाच्या तिमाहीत एकूण ठेवींत वार्षिक ३० टक्क्यांनी तर तिमाही-दर-तिमाहीत ९ टक्क्यांनी वाढ होऊन ७५ हजार कोटी रुपयांचा ओलांडला टप्पा
· कासा ठेवी गत तिमाहीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढून २५ हजार ६६६ कोटी रुपयांवर, कासा गुणोत्तर ३४ टक्के आणि कासा अधिक रिटेल ठेवी यांचे मिश्रण ६६ टक्के
· संरक्षित तरतुदींसह बँकेच्या ताळेबंदाने 1,00,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे
· वित्तीय वर्ष 24 च्या दुसऱ्या तिमाहीत बँकेने मिळविले 3.65 लाख अतिरिक्त ग्राहक आणि त्यातील 45 टक्के ग्राहक डिजिटल सुविधा आणि चॅनेलच्या माध्यमातून प्राप्त
· क्रेडिट कार्डने ओलांडला एकूण 7 लाखांचा टप्पा तर व्हिडिओ बँकिंगद्वारे 1,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवींचे संकलन
· ढोबळ कर्जवाटपात वार्षिक 24 टक्के तर तिमाहीसाठी 2 टक्के वाढ होऊन 65 हजार 29 कोटी रुपयांवर-मार्च 23 पासून 10 टक्के वाढ; वित्तीय वर्ष 24 च्या दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या संरक्षित मालमत्तेचा पोर्टफोलिओ 2922 कोटी रुपये.
· जीएनपीएत वार्षिक 1 अंशांनी वाढ होऊन 1.91 टक्क्यांवर, एनएनपीए टक्केवारी 0.60 टक्के, प्रमाणित पुनर्रचित वित्तपुरवठा क्रमाक्रमाने 1 टक्क्यांवरुन 0.8 टक्क्यांवर
· जोखीम संरक्षण गुणोत्तर तरतूद (पीसीआर) 69 टक्क्यांवर (तांत्रिक राइट-ऑफसह 73%) स्थिर आहे; आकस्मिकता आणि मानक पुनर्रचित मालमत्तेसाठी बँक 96 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करत आहे
· तिमाहीत निवडक प्रकारांमध्ये ठेवींचे दर आणि एसए दरात 25 आधार अंकांची बँकेकडून वाढ
· बँकेने “झेनिथ प्लस क्रेडिट कार्ड” चा शुभारंभ केला असून ते एक सुपर-प्रिमियम मेटल क्रेडिट कार्डचा प्रकार आहे.
· ग्राहकांना बॅंकेच्या थर्ड-पार्टी उत्पादनांचे प्रकार अधिक सक्षमरितीने वितरीत करण्यासाठी बॅंकेने मॅक्स लाइफ इन्शुरन्स, बजाज अलायन्स लाइफ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स या कंपन्याना बॅंकॅश्युरन्स भागीदार म्हणून जोडले आहे.
*मुंबई/जयपूर ता. 29 ऑक्टोबर 2023ः* एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या बैठकीत संचालक मंडळाने 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीच्या आर्थिक निकालांना मान्यता दिली.
विशेष आढावा
आर्थिक वर्ष 24 च्या दुसऱ्या तिमाहीतील देशांतर्गत चलनवाढीचा दबाव कायम होता आणि मॉन्सूनची प्रगती ऑगस्ट महिन्याच्या ऐतिहासिक सरासरीपेक्षा कमीच राहिली. त्याचबरोबर अनिश्चित जागतिक ढोबळ परिस्थितीमुळे व्याजदर चढे राहण्यास हातभार लागला आणि प्रणालीगत तरलतासुध्दा अतिशय संकुचित राहिली. या पार्श्वभूमीवर, बॅंकेने पुन्हा एकदा स्थिर तिमाही कामगिरी करताना ठेव संकलन, कर्जपुरवठा वाढ, नवे संपादन आणि डिजिटल उत्पादनांचा वाढता विस्तार आणि इतर सर्व घटकांमध्ये वाढ दर्शविली आहे, बँकेने चमकदार कामगिरी केली असून या प्रत्येक घटकामध्ये सातत्यपूर्ण वाढ दिसून आली आहे.
आपल्या ब्रँडला बळ देण्यासाठी त्याचबरोबर आपल्या ग्राहकांशी जोडण्यासाठी “बदलाव हमसे है” या विचारधारेचा अवलंब कायम ठेवत बँकेने “सोच बदलो और बँक भी” ही नवीन ब्रँड मोहीम सुरू केली आहे.
जागतिक शाश्वतता दिनानिमित्त, बँकेने अक्षय आणि हरित प्रकल्पांची पूर्तता आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी तसेच हवामान बदलाच्या जोखमींना तोंड देण्यासाठी, उत्सर्जन कमी करण्यासाठी “प्लॅनेट फर्स्ट” नावाअंतर्गत पहिली “ग्रीन फिक्स्ड डिपॉझिट्स” योजना सुरु केली होती. क्रिसीलद्वारे श्रेणी प्राप्त झालेली ही नवीन ठेव योजना आरबीआयच्या नव्या नियामक चौकटीशी सुसंगत आहे.
दृष्टीक्षेपात कामगिरी (वित्तीय वर्ष 24 ची दुसरी तिमाही):
नफा
· तरतूद-पूर्व सामान्य नफ्यात (ऑपरेटिंग प्रॉफिट पीपीओपी) वार्षिक 30 टक्के वाढ होऊन 648 कोटी रुपयांवर झेपावला. गत वित्त वर्ष 23 च्या दुसऱ्या तिमाहीतील हा नफा 499 कोटी रुपयांवर होता.
·निव्वळ नफा वित्त वर्ष 23 च्या दुसऱ्या तिमाहीतील 343 कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक 17 टक्क्यांनी वाढून वित्त वर्ष 24 च्या दुसऱ्या तिमाहीत 402 कोटी रुपयांवर झेपावला.
·निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) वित्त वर्ष 23 च्या दुसऱ्या तिमाहीतील 1083 कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक 15 टक्क्यांनी वाढून 1249 कोटी रुपयांवर
· निव्वळ व्याज मार्जिन (निम) वित्त वर्ष 24 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी 5.5 टक्क्यांवर
·भविष्यचा वेध घेणारी बँक तयार करण्यासाठी आम्ही डिजिटल, ब्रँडिंग, उत्पादने आणि वितरणामध्ये गुंतवणूक सुरू ठेवूनही मालमत्तेवरील परतावा (आरओए) आणि समभागावरील परतावा (आरओइ) अनुक्रमे 1.7 टक्के आणि 13.9 टक्के
·निधी उभारणीचा खर्च (सीओएफ) तिमाही दर तिमाही 12 अंशांनी वाढून 6.70 टक्क्यांवर पोहचला असून सरासरी सीओएफ 24 च्या पहिल्या सहामाहीसाठी 6.64 टक्के
· 30 सप्टेंबर 23 ला सीआरएआर 22.4 टक्के आणि टिअर वन 21 टक्के
ठेवसंकलन
· वित्त वर्ष 23 च्या दुसऱ्या तिमाहीत एकूण ठेवींच्या 58 हजार 335 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा एकूण ठेवींच्या रक्कमने 75 हजार कोटी रपयांचा टप्पा ओलांडत 75 हजार 743 कोटी रुपयांवर झेप; वार्षिक 30 टक्के तर तिमाहीत 9 टक्के वाढ
· वित्त वर्ष 23 च्या दुसऱ्या तिमाहीतील 24 हजार 674 कोटी रुपयांच्या तुलनेत कासा ठेवी वार्षिक 4 टक्क्यांनी वाढून 25 हजार 666 कोटी रुपयांवर, कासा गुणोत्तर आता 34 टक्के
· मुदत ठेव आणि एसए दरात बँकेकडून यंदाच्या तिमाहीत ठराविक प्रकारात 25 अंशांनी वाढ
कर्जवितरण
· बँकेच्या ढोबळ कर्जवितरणात वित्त वर्ष 24 च्या दुसऱ्या तिमाहीत वार्षिक 24 टक्क्यांच्या वाढीसह ते 65 हजार 29 कोटी रुपयांवर, वित्त वर्ष 23 च्या दुसऱ्या तिमाहीत 52 हजार 452 कोटी रुपये; सीडी गुणोत्तर 85 टक्के
· बँकेच्या एकूण कर्जवितरणापैकी वाहन कर्जाचा वाटा 32 टक्के तर सूक्ष्मउद्योग कर्ज (एमबीएल), गृहवित्त आणि व्यावसायिक बँकींग कर्जाचा वाटा अनुक्रमे 29 टक्के, 8 टक्के आणि 23 टक्के.
· वाहन आणि एमबीएल (पुर्वीचे एसबीएल) पोर्टफोलिओने (संरक्षित मालमत्तेसह) ओलांडला अनुक्रमे 25 हजार कोटी आणि 20 हजार कोटी रुपयांचा टप्पा
· एकूण कर्जापैकी 88 टक्के कर्ज रिटेल स्वरुपाचे आणि 91 टक्के कर्ज तारणासह संरक्षित
मालमत्तेचा दर्जा
·बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता (जीएनपीए) 24 च्या दुसऱ्या तिमाहीत 1.91 टक्के, वित्तवर्ष 23 च्या दुसऱ्या तिमाहीत 1.90 टक्के. तिमाही आधारावर 24 च्या पहिल्या तिमाहीतील 1.76 टक्के जीएनपीएत 15 अंशांनी वाढ. यंदाच्या तिमाहीत 2,922 कोटी रुपये कर्ज मालमत्तेचे सुरक्षितीकरण केल्यामुळे कमी आधारभूत परिणाम
· वित्त वर्ष 24 मधील दुसऱ्या तिमाहीतील निव्वळ कर्जवितरणात निव्वळ एनपीए 0.60 टक्क्यांवर
· प्रोव्हिजनिंग कव्हरेज गुणोत्तर (पीसीआर) 69 टक्क्यांवर स्थिर आहे (तांत्रिक राइट-ऑफ आणि फ्लोटिंग प्रोव्हिजनसह 73 टक्के)
·आकस्मिकता आणि मानक पुनर्रचित ताळेबदांसाठी बँकेची 96 कोटी रपयांची तरतुद. याव्यतिरिक्त, बँकेकडे 41 कोटींची तरल तरतूद आहे
पेमेंट्स आणि डिजिटल बँक एयू 0101
क्रेडीट कार्डः
o क्रेडिट कार्डचा टप्पा 7 लाखांच्या पार
o मासिक खर्च आता सप्टेंबर 2023 मध्ये 1,350 कोटी रुपये
o एकूण क्रेडिट कार्डांपैकी 72% कार्डे नवीन ग्राहकांना (NTB) जारी करण्यात आली आहेत.
व्हिडिओ बँकिंग:
o व्हिडिओ बँकिंग चॅनलद्वारे आलेल्या ग्राहकांच्या एकूण ठेवी 1,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक
o वित्त वर्ष 24 च्या दुसऱ्या तिमाहीत 90 हजार सेवा आणि मदतीसाठी व्हिडीओ कॉल्स
o सेवेचा प्रारंभ झाल्यापासून 3.7 लाखांपेक्षा अधिक कासा खाते आणि 2.3 लाखापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड प्रदान
· एयू 0101 अॅप:
o आमच्या कासा ग्राहकांद्वारे डिजिटल व्यवहाराचा हिस्सा वित्त वर्ष 24 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 98% वर स्थिर आहे. सातत्याने सुधारत असलेल्या डिजिटल पध्दतीमुळे आमच्या एयू 0101 डिजिटल बँकिंग अॅपवर मासिक सक्रिय वापरकर्ते (एमएयू) वाढण्यास मदत केली आहे.
o एयू 0101 सारख्या आमच्या डिजिटल सुविधेचा वापर करणार्या ग्राहकांची संख्या वित्त वर्ष 23 च्या दुसऱ्या तिमाहीतील 14.3 लाखांवरुन यंदाच्या तिमाहीमध्ये 24.2 लाखांपर्यंत वाढली. यापैकी 13.1 लाख ग्राहक दरमहा सक्रियपणे सेवांचा लाभ घेत आहेत
· एयू यूपीआय क्यूआर:
o वित्त वर्ष 24 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत 11 लाख युपीआय क्यूआर कोडची स्थापना
o यूपीआय व्यासपीठावरील व्यवहारांचे निरीक्षण करून एयू यूपीआय क्यूआर वापरून व्यापाऱ्यांना 320 कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे कर्ज वितरित. या कर्जाचा सरासरी आकार दोन लाख रुपयांच्या आसपास आहे
नेटवर्क
·आमचे वितरण जाळे वाढवण्याच्या आमच्या धोरणाला अनुसरून, आम्ही तिमाहीत 4 टचपॉइंट जोडले आहेत आणि संपूर्ण वर्षासाठी, बँकेने 50 पेक्षा अधिक टचपॉइंट्स अतिरिक्त उघडण्याची योजना आखली आहे.
· आम्ही आता 21 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1,042 भौतिक टचपॉइंट्ससह कार्यरत
पतमापन दर्जा
· क्रिसिल AAप्लस/मुदत ठेव योजनांसाठी स्थिर
· क्रिसिल AA/टियर टू रोख्यांसाठी स्थिर
· मुदत ठेव प्रमाणपत्रांसाठी क्रिसिल Aवन प्लस
वित्त वर्ष 24 च्या पहिल्या सहामाहीतील कामगिरीचे वैशिष्ट्ये
नफा
-बँकेचा पूर्व-तरतूद सामान्य नफा (पीपीओपी) वित्त वर्ष 24 च्या पहिल्या सहामाहीत 34 टक्क्यांनी वाढून 1194 कोटी रुपयांवर. 23 च्या पहिल्या सहामाहीत हाच नफा 893 कोटी रुपये होता. तर निव्वळ नफा वार्षिक 29 टक्क्यांनी वाढून 789 कोटी रुपयांवर, वित्त वर्ष 23 च्या पहिल्या सहामाहीत तो 610 कोटी रुपये होता.
-बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) वार्षिक 21 टक्क्यांनी वाढून यंदा 2495 कोटी रुपयांवर. वित्तवर्ष 23 मध्ये ते 2059 कोटी रुपयांवर होते.
-निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) वित्त वर्षच्या पहिल्या सहामाहीत 5.6 टक्के तर 23 च्या पहिल्या सहामाहीत ते 6.0 टक्के होते.
-मालमत्तेवरील परतावा (आरओए) आणि समभागावरील परतावा (आरओइ) अनुक्रमे 1.7 टक्के आणि 13.9 टक्के
अन्य महत्वाची कामगिरी
· बँकेचे नक्त मालमत्ता आता 11,750 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे, 5 वर्षांमध्ये त्यात पाच पटीने वाढ
· बँकेने बाजारपेठेतील प्रत्यक्ष अस्तित्व वाढवले आहे आणि तिचे भौतिक जाळे आता 30 सप्टेंबर 2023 रोजी 21 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1,042 टचपॉइंट्सवर विस्तारले आहे.
· सर्व 3 रेटिंग एजन्सी, क्रिसिल रेटिंग्स, केअर रेटिंग्स आणि इंडिया रेटिंग्सने बँकेला “एए/स्टेबल” पतदर्जा दिले आहे.
· आपल्या ग्राहकांना बँकेच्या थर्ड पार्टी उत्पादन ऑफरचा विस्तार करण्याच्या उद्देशाने बँकेने मॅक्स लाइफ इन्शुरन्स, बजाज अलायन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स यांच्याशी बँकाशुरन्स भागीदार म्हणून करार केला आहे.
· सीएसआर आघाडीवर, एयू इग्नाईट या बँकेच्या कौशल्य प्रशिक्षण अकादमीने यशाचे पाचवे वर्ष साजरे केले. प्लेसमेंट सहाय्य प्रदान करण्याच्या 78 टक्के नोंदीसह 15,800 पेक्षा जास्त उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण दिले आहे.
पुरस्कार आणि मान्यता
· एयू बँकेला फायनान्शियल एक्सप्रेस अवॉर्ड्स 2023 द्वारे “इंडियाज बेस्ट स्मॉल फायनान्स बँक 2021-22” पुरस्कार.
· एयू बँकेने अटल पेन्शन योजना (एपीवाय) मध्ये 100 टक्के लक्ष्य साध्य करत पीएफआरडीएचा “उत्कृष्टता पुरस्कार” जिंकला.
· एयू बँकेला “एयू उद्योगिनी” उपक्रमासाठी भारतीय सीएसआर पुरस्कार 2023 द्वारे “वर्षातील सर्वात प्रभावी महिला रोजगार उपक्रम” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बँकेच्या कामगिरीवर टिप्पणी करताना एयू स्मॉल फायनान्स बँकेचे एमडी आणि सीईओ श्री. संजय अग्रवाल (Agarwal) म्हणाले, “भू-राजकारण, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि व्याजदरांवर सतत दबाव आणणारी चलनवाढ यामुळे जागतिक वातावरण खूपच अनिश्चिततेचे झाले आहे. भारतातील आर्थिक वातावरण मजबूत आणि लवचिक दिसत आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. तथापि, चलनवाढ, तरलता आणि हवामानाच्या प्रवाहातील व्यत्यय याबाबतची आव्हाने कायम असल्याने वित्तपुरवठादार म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि आम्ही आमची रणनीती आखताना सतर्क असून प्रसंगानुरूप पावले उचलत आहोत.
या पार्श्वभूमीवर, आर्थिक वर्ष 24 च्या दुसऱ्या तिमाहीत ठेवी, डिजिटल आणि कर्जवितरणातील वाढीसह आमची कामगिरी लवचिक आणि सातत्यपुर्ण होती. जिथे वाढ आणि बाजारपेठेतील प्रवेशासाठी आशादायक शक्यता दिसत आहेत, तेथे ही लवचिकता आमच्यासाठीच्या बाजारपेठेत सकारात्मक दृष्टीकोनाला पूरक ठरली आहे. अगदी सध्याच्या वाढलेल्या खर्चाच्या आणि तीव्र स्पर्धेच्या वातावरणात आमचे मुख्य धोरणात्मक लक्ष अल्प खर्चात रिटेल ठेवीसंकलनावर आहे. आम्ही नव्याने उभा केलेला ‘स्वदेश बँकिंग’ समूह बँक सेवेपासून लाखोंच्या संख्येने वंचित असलेल्या ग्रामीण भारतात अधिक खोलवर जाऊन आर्थिक समावेशन धोरणाला पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित करतो. याव्यतिरिक्त, आमची नवीन ब्रँड मोहीम “सोच बदलो और बँक भी” एक मजबूत ब्रँडची उपस्थिती प्रस्थापित करणे आणि मनामनांध्ये उच्च प्रमाणात ठसविण्याचे कार्य सुरूच ठेवेल.
आम्ही दक्षता बाळगताना, दीर्घकालीन भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मी खूप आशावादी आहे आणि बँकिंग क्षेत्र सातत्यपुर्ण वाढीच्या कालावधीसाठी तयार आहे. आमचा व्यवसाय सर्व आघाड्यांवर उत्कृष्टरित्या होत आहे. तसेच या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला वित्त वर्ष 24 साठी निश्चित केलेल्या कामगिरीच्या अंदाजाला पुष्टी देण्यासाठी आमच्यात मोठा आत्मविश्वास निर्माण करत आहे. आम्ही आमचा ताळेबंद आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने शाश्वत वाढीवर लक्ष केंद्रित करत आहोत.”