● आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ ह्या स्पर्धेचा अधिकृत सहयोगी निसान, ह्या दीर्घकालीन सहयोगाचे स्मरण राहावे म्हणून, मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन आणत आहे.
● विशाल, दणकट, देखणी निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशनमधील वाहनांचा अंतर्भाग व बाह्यभाग पूर्णपणे काळ्या रंगाचा आहे
● ३६० अंशातील अराउंड व्ह्यू मॉनिटर, मागील एसी व्हेण्ट्ससह सेंटर कन्सोल आर्मरेस्ट, थीम्ड फ्लोअर मॅट्स आणि वायरलेस चार्जर ह्यांचा अतिरिक्त सुविधांमध्ये समावेश आहे
● मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन केवळ मॅग्नाइट एक्सव्ही एमटी, टर्बो एक्सव्ही एमटी आणि टर्बो एक्सव्ही सीव्हीटी ह्या विशिष्ट व्हेरिएंट्समध्येच उपलब्ध आहे
● १४ सप्टेंबर २०२३ रोजी सर्व निसान टचपॉइंट्सवर बुकिंग्ज सुरू होत आहेत
गुरूग्राम, : निसान आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा अधिकृत सहयोगी आहे. आयसीसीच्या स्पर्धांचा अधिकृत सहयोगी म्हणून काम करण्याचे निसानचे हे सलग ८वे वर्ष आहे. ह्याच दीर्घकालीन सहयोगाचे स्मरण म्हणून मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन बाजारात आणण्यात आली आहे. ह्याद्वारे आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेसोबतचा संबंध साजरा करण्याचा अव्वल पर्याय निसान ग्राहकांना पुरवत आहे. निसान मोटर इंडियाने (एनएमआयपीएल) आज मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशनच्या प्री-बुकिंगचा प्रारंभ झाल्याची घोषणा केली. कुरो ह्या शब्दाचा अर्थ जपानी भाषेत ‘काळा’ असा होतो. स्पेशल एडिशनचा अर्क ह्या शब्दांत सामावलेला आहे. मनात भरणारी शैली आणि जपानी अभिजातता ह्यांचे दृश्य स्वरूप ह्या अनन्यसाधारण उत्पादनात आहे. कुरो थीम आणि स्पेशल एडिशन एसयूव्ही ह्यातून अव्वल दर्जा व प्रस्थापित खात्रीशीरता ह्यांचे प्रतिबिंब दिसते.
निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन सणासुदीच्या उत्साहाचा सूर प्रस्थापित कऱण्यासाठी सज्ज आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये ही गाडी अधिकृतपणे बाजारात आणली जाणार आहे आणि तिच्या किमतीही जाहीर केल्या जाणार आहेत. आज ह्या गाडीचे बुकिंग अधिकृतपणे खुले झाले. मॅग्नाइट एक्सव्ही एमटी, मॅग्नाइट टर्बो एक्सव्ही एमटी आणि मॅग्नाइट टर्बो एक्सव्ही सीव्हीटी ह्या सर्व उच्च श्रेणींमध्ये ११,००० रुपये भरून स्पेशल एडिशनमधील गाडी बुक करता येईल.
निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राकेश श्रीवास्तव म्हणाले, “ह्या सणासुदीच्या काळात मूल्य व नवोन्मेषाच्या शोधात असलेल्या चिकित्सक ग्राहकांसाठी निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन काळ्याशार रंगाच्या अभिजात रूपात अव्वल दर्जाच्या सुविधा पुरवणार आहे. शैली, मूल्य व सुरक्षितता ह्यांची सांगड घालून ही कार खऱ्या अर्थाने अपवादात्मक ड्रायव्हिंगचा अनुभव देणार आहे.”
निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशनमधील वाहनांचा अंतर्भाग व बाह्यभाग पूर्णपणे काळ्या रंगात आहे. त्यातून एक अव्वल दर्जाचे, भव्य आणि शैलीदार विधान ही कार करते. ह्यामध्ये अभिजातता व आधुनिकता ह्यांचा मिलाफ आहे. छाप पाडणारे व ठळक डिझाइन असलेल्या बाह्यभागात सौंदर्यपूर्ण अशा पूर्णपणे काळ्या रंगाची ग्रिल, स्किड प्लेट, रूफ रेल्स, ब्लॅक अलॉइज, हेडलॅम्प्स सुविधा आहेत. ब्लॅक फिनिशर आणि वैशिष्ट्यपूर्ण बॅझ ह्यामुळे कुरोच्या लक्षवेधी रचनेत भर पडते.
शिवाय, मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशनचा वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत भागात अव्वल दर्जाचे चकचकीत काळ्या रंगातील इन्स्ट्रुमेंट पॅनल, काळ्या रंगछटेतील अंतर्गत रचना, काळे डोअर ट्रिम इन्सर्ट्स आहेत. त्यामुळे डिझाइन घटकांमध्ये शैलीचा अतिरिक्त पदर जोडला गेला आहे. ही अंतर्गत रचना ग्राहकांना आनंद देईल व त्यांची प्रशंसा प्राप्त करेल ह्याची ग्वाही आहे. स्पेशल एडिशनमध्ये अनेक अद्ययावत सुविधा देण्यात आल्या आहेत. ३६० अंशांचा अराउंड व्ह्यू मॉनिटर (एव्हीएम), रीअर एसीसह सेंटर कन्सोल आर्मरेस्ट, अधिक रुंद आयआरव्हीएम, थीम्ड फ्लोअर मॅट्स आणि वायरलेस चार्जर आदी सुविधा अधिक सोय व शैलीसाठी देण्यात आल्या आहेत.
निसान मॅग्नाइटला ग्लोबल एनसीएपीतर्फे प्रौढ प्रवासी सुरक्षिततेसाठी फोर-स्टार रेटिंग प्रदान करण्यात आले आहे. आपल्या विभागात ही गाडी सर्वोत्तम सुरक्षितता मानकांची पूर्तता करते. निसानने सर्व प्रकारांमध्ये अतिरिक्त सुरक्षितता सुविधा आणून मॅग्नाइट अलीकडेच अद्ययावत केली आहे. ह्या सुरक्षितता सुविधांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो:
● इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ईएसपी)
● ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस)
● हिल स्टार्ट असिस्ट (एचएसए)
● टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस)
मॅग्नाइटने भारतातील बी-एसयूव्ही विभागातील पसंतीची गाडी म्हणून स्वत:ला ठामपणे प्रस्थापित केले आहे. डिसेंबर २०२० मध्ये बाजारात आलेली मॅग्नाइट निसानच्या ‘मेक-इन-इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ ह्या उत्पादन तत्त्वज्ञानाचे उदाहरण आहे. त्याचे डिझाइन जपानमध्ये करण्यात आले आहे, तर उत्पादन भारतात करण्यात आले आहे.
निसानने अलीकडेच निसान मॅग्नाइट गेझा स्पेशल एडिशन ७,३९,००० रुपये किमतीला (एक्स-शोरूम, दिल्ली) बाजारात आमली होती. मॅग्नाइट गेझा स्पेशल एडिशनच्या माध्यमातून निसानने प्रगत इन्फोटेनमेंट प्रणाली, शक्तिशाली कामगिरी आणि सुधारित सुरक्षितता ह्यांचा आकर्षक मिलाफ ग्राहकांना दिला होता. त्यामुळे चिकित्सक भारतीय ग्राहकांची प्रवासाची व्याख्या बदलणार आहे.
विशाल, दणकट, देखणी (बिग, बोल्ड, ब्यूटीफूल) निसान मॅग्नाइट १५ जागतिक बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाते. अलीकडेच मॅग्नाइट सेशेल्स, बांगलादेश, युगांडा आणि ब्रुनेई ह्या बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात आली. अलीकडील काही वर्षांत, निसान इंडियाने आपली निर्यात बाजारपेठ युरोपमधून सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, ओमान, कतार, बहारीन व कुवैत ह्या मध्यपूर्वेकडील देशांमध्ये हलवली आहे.
आता देशभरातील निसान डीलरशिप्समध्ये आणि निसानच्या वेबसाइटवर https://book.nissan.in/ प्रीबुकिंग सुरू झाले आहे.