“वीरे दी वेडिंग”चे पॉवरहाऊस क्रिएटर असलेल्या एकता आर कपूर आणि रिया कपूर यांनी त्यांच्या आगामी प्रकल्पाविषयी बरीच गुप्तता पाळली. आज प्रतिष्ठित अशा टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल (टीआयएफएफ) 2023 मध्ये त्यांच्या विनोदी “थँक यू फॉर कमिंग” कलाकृतीची अधिकृत निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल 2023 मध्ये 15 सप्टेंबर 2023 रोजी त्यांच्या मनोरंजक कलाकृतीचा ग्रँड गाला वर्ल्ड प्रीमियर होणार असून रॉय थॉम्पसन हॉलमध्ये हसून-हसून पोट दुखेल. यंदा टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलला प्रदर्शित होणारा हा एकमेव हिंदी सिनेमा आहे!
करण बुलानी दिग्दर्शित आणि राधिका आनंद तसेच प्रशस्ती सिंग लिखित या सिनेमात भूमी पेडणेकर, शहनाझ गिल, डॉली सिंग, कुश कपिला, शिबानी बेदी, प्रधुमन सिंग मॉल, नताशा रस्तोगी, गौतमिक, सुशांत दिवगीकर, सलोनी दैनी, डॉली अहलुवालिया, करण कुंदरा आणि विशेष भूमिकेत अनिल कपूर झळकणार आहे. हा सिनेमा 6 ऑक्टोबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
याविषयी अधिक बोलताना रिया कपूर म्हणाली, “हा सध्याच्या पिढीचा सिनेमा असून टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल 2023 मध्ये आमच्या फिल्मचा वर्ल्ड प्रीमियर होतोय ही बाब अतिशय सन्मानाची आहे. सिनेमाची स्टोरीलाईन हटके आहे आणि तिचा दृष्टिकोन ‘बोल्ड’ आहे. ही मुव्ही म्हणजे पक्की बॉलिवूड एंटरटेनर असून मस्ती-म्युझिकने परिपूर्ण म्हटली पाहिजे. ज्यामुळे ही निवड अधिकच गोड होते! मला या फिल्मचा अभिमान वाटतो. फारच प्रतिभावंत मुलीनी त्यांचे हृदय आणि आत्मा ओतून हा सिनेमा तयार केला आहे. संपूर्ण जगासमोर ही कलाकृती कधी एकदा प्रदर्शित होते असं झाले आहे.”
“आमचा सिनेमा प्रतिष्ठित TIFF प्लॅटफॉर्मसाठी सज्ज असल्याचे जाहीर करताना मला खरोखरच आनंद होत आहे. या प्रोजेक्टचे माझ्या हृदयात एक विशेष स्थान असून मी ज्याक्षणी जागतिक प्रेक्षकांसमोर कलाकृती सादर करू शकेन त्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. अशा प्रतिष्ठित महोत्सवाचा भाग बनण्याची संधी ही एक अतिशय सन्मानाची गोष्ट म्हटली पाहिजे. मी यातून मिळणारा प्रतिसाद आणि स्वागताची वाट पाहत आहे”, असे बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालिक एकता आर कपूर म्हणतात.
थँक यू फॉर कमिंग ही कथा कनिका कपूरची आहे, तिने वयाची तिशी गाठलेली आहे. ती अजून सिंगल आहे, तिचा खऱ्या प्रेमाचा आणि आनंदाचा शोध सुरू आहे.
ही बालाजी टेलिफिल्म लिमिटेड आणि अनिल कपूर फिल्म कम्युनिकेशन नेटवर्क प्रा. लिमिटेडची निर्मिती आहे, तिचे दिग्दर्शन करण बुलानी याने केले आहे तर राधिका आनंद आणि प्रशस्ती सिंग लेखक आहेत, थँक यू फॉर कमिंग 06 ऑक्टोबर 2023 रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे.