MUMBAI : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त १३ ऑगस्ट रोजी बीओबी कप ८/९/१०/११/१४/१५ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा आरएमएमएस, परेल, मुंबई-१२ येथे आयोजित करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग, आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीने होणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या सौजन्याने विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ९० पुरस्कार तसेच प्रत्येक वयोगटातील सर्वोत्तम एका बुध्दिबळपटूला रोख रुपये तीन हजार असे एकूण ६ रोख पुरस्कार दिले जातील.
प्रत्येक वयोगटात किमान चार साखळी फेऱ्यांमधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. प्रत्येक वयोगटांमधील पहिल्या १० मुलांना व पहिल्या ५ मुलींना बीओबी कपचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे १२ ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा.