Mumbai / मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना व आयडियल ग्रुप-स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे १२ ऑगस्टला क्रीडाप्रेमी स्व.चारुशीला मोहिते स्मृती चषकासाठी ७/१३/१५ वर्षाखालील वयोगटांची मुंबई शहर जिल्हा निवड चाचणी जलद बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आरएमएमएस सहकार्याने परेल येथे होणाऱ्या बुध्दिबळ स्पर्धेमध्ये कुलाबा ते चुनाभट्टी अथवा माहीम येथील परिसरात राहणाऱ्या सदर वयोगटातील खेळाडूंसाठी मर्यादित आहे. ७ व १३ वर्षाखालील गटातून प्रत्येकी पहिले दोन आणि १५ वर्षाखालील गटातून पहिले चार विजेते-उपविजेते राज्य निवड चाचणी बुध्दिबळ स्पर्धेसाठी मुंबई शहराचे प्रतिनिधित्व करतील.
७ वर्षाखालील खुला गट, ७ वर्षाखालील मुली गट, १३ वर्षाखालील खुला गट, १३ वर्षाखालील मुली गट, १५ वर्षाखालील खुला गट आणि १५ वर्षाखालील मुली गट अशा एकूण ६ गटात ही स्पर्धा साखळी पद्धतीने होणार असून प्रत्येक फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. प्रत्येक गटातील पहिल्या ५ मुलांसाठी व ५ मुलींसाठी पुरस्कार दिला जाईल. स्पर्धकांची एमसीए नोंदणी असणे, अनिवार्य आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी अथवा गणेश पाटील (९७०२९३४९३५) यांच्याकडे १० ऑगस्ट, रात्रौ ८.०० वाजेपर्यंत संपर्क साधावा.
******************************