आपली स्टोरी आपोआप घडत नसते..ती घडवावी लागते..
आजवर न घडलेली गोष्ट सांगणाऱ्या ‘डेटभेट’ चित्रपटाचा रोमॅंटिक ट्रेलर भेटीस
NHI /- सिने प्रतिनिधि
अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट आणि झाबवा एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘डेटभेट‘ या चित्रपटाचा रोमॅंटिक ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला. सोनाली कुलकर्णी,संतोष जुवेकर आणि हेमंत ढोमे यांच्या खुमासदार अभिनयानं रंगलेला अन् प्रेमाची नवी कोरी गोष्ट सांगणारा हा ट्रेलर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं तेव्हाच त्याविषयीची उत्सुकता वाढली होती. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित ‘डेटभेट’ हा चित्रपट येत्या १४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.
‘डेटभेट’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसणारं लंडन शहर पुन्हा एकदा लोकांचे मन जिंकण्यात मात्र यशस्वी ठरलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच पडद्यावर सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवकेर एकत्र काम करताना दिसणार आहेत. तर नेहमीच आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा वेगळा अंदाज ‘डेटभेट’ चित्रपटात पहायला मिळेल. या चित्रपटाची कथा-दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते यांचे आहे,तर चित्रपटाची पटकथा-संवाद लेखन अश्विनी शेंडेचं आहे. भारतातासोबतच परदेशातील सौंदर्य अतिशय सुंदरपणे आपल्यात कॅमेऱ्यात टिपण्याचं काम छायाचित्रकार प्रदीप खानविलकर यांनी केले आहे.
‘डेटभेट’ च्या ट्रेलरमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटातील ऐकू येणारे संवाद चित्रपटाच्या टोटल फिल्मीपणाची झलक देऊन जातात. ‘डेटभेट’मध्ये सोनालीच्या सौंदर्याचा गोडवा,संतोष जुवेकरचा हॅन्डसम लूक आणि हेमंत ढोमेचा विदेशी बाबू अवतार चित्रपटाच्या कथाकात अधिक रंग भरताना दिसत आहेत. अनया पंडित या हॅप्पी गो लकी मुलीभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. प्रेमाचं पहिलं नातं फसल्यानंतर दुसऱ्यांदा हाच प्रेमाचा प्रवास अनुभवणाऱ्या अनयाची सातासमुद्रापलिकडील डेटभेट चित्रपटात अतिशय रंजकपणे दाखवण्यात आली आहे.
‘डेट भेट’ चित्रपटाची निर्मिती शिवांशु पांडे ,हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेज पटेल ,प्रशांत शर्मा ,
हनी शर्मा यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते प्रशांत शेळके हे आहेत .’डेटभेट’ चित्रपटाचं संगीत ‘व्हिडिओ पॅलेस’ या म्युझिक लेबल द्वारे प्रदर्शित होत आहे तर चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन फ़िल्मअस्त्रा स्टुडिओज करत आहेत .