INTERNATIONAL NEWS : आजकाल लोकांची जीवनशैली इतकी व्यस्त झाली आहे की झोपही पूर्ण होत नाही. चांगली झोप घेण्यासाठी लोक काय काय करत नाही. कित्येकदा लोक प्रवासातही झोपतात. तुम्ही कधी प्रवासात कार किंवा बसमध्ये झोपला आहात का? बसमध्ये नेहमी झोप लागते. पण आता प्रवासात झोपणे एखाद्याचा जीव धोक्यातही टाकू शकतो असे आम्ही म्हटले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्हाला आम्ही जे सांगतोय ते खोटं वाटत असेल पण प्रत्यक्षात असं घडलं आहे. बसमध्ये झोपणे किती धोकादायक असू शकते हे दाखविणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल.
Taking a nap pic.twitter.com/WFdmB6GERK
— hard go that clips (@hardgothatclips) June 17, 2023
इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे ज्यामध्ये चालत्या बसमध्ये डुलकी घेणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की रात्रीची वेळ आहे. बस वेगात रस्त्यावर धावत आहे. बसच्या दरवाज्याशेजारी एक व्यक्ती बसला आहे आणि दुसरा व्यक्ती ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसला आहे दरवाज्याशेजारी बसलेल्या व्यक्तीला झोप येते आणि झोपेतच तो पेंगू लागतो झोपलेल्या व्यक्तीकडे कोणाचेही लक्ष नसते. तेवढ्यात एक मोठा अपघात होतो.
बसच्या दरवाज्यातून थेट रस्त्यावर गेला व्यक्ती
गाढ झोपत असलेला व्यक्ता अचानक झोपेत पेंगू लागतो आणि डुलत डुलत दरवाज्याच्या दिशेने झुकतो. त्याचवेळी त्याचा तोल जातो आणि तो दरवाज्यातून थेट रस्त्यावर पडतो. सगळं काही इतक्या वेगात घडतं की त्या व्यक्तीला स्वत:ला सावरण्याची संधी देखील मिळत नाही. दरवाजा उघडा होता त्यामुळे तो व्यक्ती खाली पडताच थेट दरवाज्यातून बाहेर फेकला जातो. हे दृश्य फार भयावह आहे. जेव्हा ही व्यक्ती सीटवर खाली पडते तेव्हा ड्रायव्हर लगेच गाडी थांबवतो आणि ड्रायव्हरशेजारी बसलेला व्यक्ती खाली उतरून पडलेल्या व्यक्तीला पाहायला जातो. इथेच व्हिडिओ संपतो.
आता या अपघातात त्या व्यक्तीचे काय झाले असेल हे माहीत नाही. मात्र तो ज्या पद्धतीने पडला त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली असावी. बसच्या पुढच्या सीटवर झोपण्याची चूक करणाऱ्या सर्वांसाठी हा व्हिडिओ सावध राहण्याचा इशारा देतो आहे.